पनवेल / प्रतिनिधी
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे यांची भेट घेऊन पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली. त्यावेळी सागर भाई संसारे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या बाबतीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार महेश साळुंखे यांना दिलेले आहेत. महेश साळुंखे यांचा पनवेल महानगरपालिकेतील अनेक वॉर्डमध्ये जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांच्याकडे अनेक राजकीय कार्यकर्ते हे उमेदवारीसाठी विचारणा करण्याकरता येत आहेत.
महेश साळुंखे यांनी सांगितले की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो जो आम्हाला सन्मानाची वागणूक देईल व सत्तेमध्ये योग्य प्रकारे वाटा देईल त्या गटाला आम्ही आमच्या पक्षाचा जाहीर पाठिंबा देउ नाहीतर आम्ही स्वबळावर आमचे उमेदवार पनवेल महानगरपालिकेमध्ये उभे करू अशा प्रकारची माहिती महेश साळुंखे यांनी दिलेली आहे.
याबाबत लवकरच ते पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील रणनीती स्पष्ट करणार आहेत.