मध्यप्रदेशातील आरोपी पकडण्यासाठी खांदेश्‍वर पोलीसांची शोध मोहिम...
मध्यप्रदेशातील आरोपी पकडण्यासाठी खांदेश्‍वर पोलीसांची शोध मोहिम


पनवेल/प्रतिनिधी ः
अल्पवयीन मुलीचे मध्यप्रदेशमधून अपहरण करणारा आरोपी खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दित लपून बसल्याची माहिती खांदेश्‍वर पोलीस ठाण्यास प्राप्त झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्य प्रदेशमधील धार जिल्हयातील पीथमपुर येथील आरोपी भदईराम उर्फ रामनाथ उर्फ रामबाबू याने धन्नड या गावातून 7 वर्षीय शिवानी या मुलीचे अपहरण करुन तो गायब झाला होता. दि. 10 एप्रिल रोजी त्याने या मुलीचे अपहरण केले होते. याबाबत पीथमपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीला महाराष्ट्रात नवी मुंबई खांदेश्‍वर पोलीस ठाणे पनवेलच्या हद्दित असल्याचे पाहिले गेले असल्याने खांदेश्‍वर पोलीसही या आरोपीचा शोध घेत आहेत. तरी या आरोपीबाबत कुणाला काही माहिती असल्यास खांदेश्‍वर पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन खांदेश्‍वर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे. सदर आरोपीस पकडून देणार्‍यास पीथमपूर पोलिसांनी 10 हजार रुपयांचे बक्षिसही जाहीर केले आहे. तसेच याबाबत माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Comments