अनधिकृत पार्किंगला लागणार चाप, अनेक महिन्यानंतर टोईंग वॅन पुन्हा सुरु....
अनधिकृत पार्किंगला लागणार चाप, अनेक महिन्यानंतर टोईंग वॅन पुन्हा सुरु....


पनवेल वैभव / दि.१० (संजय कदम) : पनवेल शहर व नवीन पनवेल परिसरात अनेक महिने बंद असलेल्या टोइंग व्हॅन गेल्या काही दिवसांपासून पुन्हा रस्त्यावर सुरु झाले आहे. 
टोईंग व्हॅनवरील कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांबाबत तक्रारी आल्याने यंत्रणा तात्पुरती बंद करण्यात आली होती. पनवेल व नवीन पनवेल परिसरात टोइंग व्हॅन यंत्रणा बंद असल्याने रस्तोरस्ती नियमबाह्यपणे वाहने उभी करण्यात येत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने पुन्हा टोइंग व्हॅन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक शाखेने सम-विषम पार्किंग, बेशिस्त पार्किंग यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर वाहने पार्क करताना ती योग्य ती ठिकाणी पार्क करावी असे आवाहन वाहतूक शाखेने केली आहे. तसेच शाळा, हॉस्पिटल तसेच मार्केट परिसरात वाहने पार्क करू नयेत जेणेकरून इतरांना त्रास होईल असे पार्किंग करू नये अशी मागणी केली आहे. यावेळी वाहतूक पोलिसांनी व्हॅनवर उद्घोषक बसवण्यात आल्याचे सांगितले. कारवाई दरम्यान उद्घोषक वरून नागरिकांना चुकीच्या ठिकाणी असलेले पार्किग मधील वाहने काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी वाहनचालकांनी नागरिकांना सेवेऐवजी त्रासच अधिक होतो, शिवाय दुजाभाव होतो. हे बदल करून कारवाई पारदर्शकता असावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
फोटो : अनेक महिन्यानंतर टोईंग वॅन पुन्हा सुरु
Comments