आमिष दाखवून ३७,७५,५२७ रूपये लुबाडले....
जास्त व्याज दराने उच्च परतावाबाबत खोटे आमिष दाखवून ३७,७५,५२७/- रूपये लुबाडणाऱ्या गुन्हेगारास उत्तर प्रदेश येथुन अटक    

पनवेल वैभव / दि. २८ ( संजय कदम ): जास्त व्याज दराने उच्च परताव्याबाबत खोटे आमिष दाखवून 37,75,527/- रूपये लुबाडणाऱ्या एका  गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने नोएडा उत्तर प्रदेश येथुन अटक   केली आहे . 
                 पनवेल शहरातील ७३ वर्षीय जेष्ठ नागरिकांला आरोपी रविशंकर सुरेशप्रसाद मिश्रा उर्फ बी.एल. पटेल, वय ३० वर्षे, रा. रिवा, राज्य मध्य प्रदेश यांने आपण ई पी एफ ओ ऑफीस, नवी दिल्ली येथुन बोलत असल्याचे खोटे सांगुन फिर्यादी यांना पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड डिपॉजि कॉन्फीर्मशन या शासनाच्या स्किम मध्ये पैसे गुंतवणुक करून त्यामधुन ७ ते ८ महिन्यात जास्त व्याज दराने उच्च परताव्याबाबत खोटे अमिष दाखवून त्यांच्या  अॅक्सीस बँक, व स्टेट बँक ऑफ इंडिया, या दोन वेगवेगळ्या बँकेच्या खात्यामधुन फोन पेद्वारे वेळोवेळी एकुण रूपये ३७,७५,५२७/- स्विकारून त्यांची फसवणुक केली होती . याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली  सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभय कदम, पोहवा निरज थवई, पोशि विद्याधर गायकवाड, पोशि अभय मे-या, पोना प्रवीण पाटील , मपोशि शितल कोकणी आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सखोल माहिती घेतली असता सदर आरोपी हा नोयडा, मध्य प्रदेश येथे लपून बसल्याचे आढळून आल्याने त्याठिकाणी सदर पथकाने जाऊन सापळा रचून आरोपीला जेरबंद आहे . 
फोटो - आरोपींसह पोलिसांचे पथक
Comments