गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ;  केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा..


पनवेल दि.१२(वार्ताहर):  राज्य शासनाने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात आज पनवेलमध्ये काँग्रेस पक्षा तर्फे पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रतीकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा काढून केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.  
            पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटती जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे,  महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, आरती ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, लतीफ शेख, लीला कातकरी, डॉक्टर अमित दवे, अमित  लोखंडे, राकेश जाधव, सुरेश पाटील, सुधीर मोरे यांच्यासह शेकडो त्रस्त ग्राहक सहभागी झाले होते त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. तसेच गॅसची दरवाढ रद्द करा अशी मागणी केली. 
सदर मोर्चा हा प्रांत कायार्लयापर्यंत नेण्यात आला. यावेळी निवेदन देताना पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगिलते की, शासनाने गॅस सिलेंडर ची दरवाढ केली आहे. ती सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. तसेच यामुळे गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई दाखवून ३ ते ४ हजाराला सिलेंडर ब्लॅक ने विकले जात आहेत. यासाठी शासनाने भरारी पथक नेमून संबधीतांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे, 
तर नगरसेवक हरेश केणी यांनी सुद्धा मोदी सरकारचा निषेध करून गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल बंद पडली आहेत. यातून महागाई वाढणार आहे व कित्येकांच्या उद्योग धंद्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. 


फोटो: काँग्रेस मोर्चा
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image