पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू मिळाल्या परत ...
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू मिळाल्या परत 


पनवेल वैभव / दि. १४ ( वार्ताहर ) :  पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू परत  मिळाल्याची  घटना पनवेल मध्ये घडली आहे.  
                 पनवेल शहर वाहतूक विभागात  पनवेल रेल्वे स्टेशन ( पश्चिम ) परिसरात वाहतूक नियमन करीत असताना  श्रीमती.रिंकू प्रजापति राहणार भाईंदर यांनी सांगितले की त्या करंजाडे येथे त्यांच्या नातेवाईकाकडे आले असता आमची बॅग व त्यातील मौल्यवान वस्तू रिक्षामध्ये गहाळ झाल्या आहेत आम्ही रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालका यांचा शोध घेतला व विचारपूस केली परंतु रिक्षाचालक आम्हास मिळून आला नाही तरी तरी कृपया आपण मदत करावी व  रिक्षा चालकाचा शोध घेऊन आमची मूल्यवान वस्तू मिळेल का म्हणून सांगितले असता आम्ही तात्काळ  सदर महिलेने मोबाईल द्वारे ऑनलाइन रित्या पेमेंट ट्रान्सफर केलेले पाहून सदरचे पैसे कोणाला पाठवले आहेत त्या रिक्षाचालकाचा  सोशल मीडियाचा वापर व रेल्वे स्टेशन परिसरात विचारपूस करून  शोध घेतला व रिक्षा चालकाकडून श्रीमती रिंकू प्रजापती व त्यांच्या मुलगा यांच्याकडे त्यांची हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या त्यांनी पनवेल शहर वाहतूक पोलिसांचे आभार व समाधान व्यक्त केले . वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पनवेल शहर वाहतूक) औदुंबर पाटील  यांच्या मार्गदर्शनाखालीयावेळी पोलीस उपनिरीक्षक शेरखाने, पो हवा युवराज येळे, पो हवा आमीर मुलाणी आदी सदर ठिकाणी कार्यरत होते . 
फोटो - शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू मिळाल्या
Comments