सराईत सोनसाखळी इराणी चोराला पोलिसांनी केले फिल्मी स्टाईल ने गजाआड ...
सराईत सोनसाखळी इराणी चोराला पोलिसांनी केले फिल्मी स्टाईल ने गजाआड ...
पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : पनवेलसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात मोठ्या प्रमाणात चैन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी अत्यंत मुळापर्यंत जाऊन तपास केले.बातमीदार त्याचबरोबर तांत्रिक बाबींचा अवलंब करत सराईत सोनसाखळी चोराला अखेर जेरबंद करण्यात आले.
                  पनवेल व नवी मुंबई परिसरात गाडीवर येऊन रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या गळ्यामधून सोन्याचे दागिने खेचून घेण्याचे प्रकार घडत आहे.विशेष करून महिलांचे मंगळसूत्र, गंठण, सोन्याची चैन याची स्नॅचिंग होत आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या अनुषंगाने तसेच संबंधित नवी मुंबईचे  पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परिमंडळ-उप पोलीस उपायुक्त डॉ प्रशांत मोहिते आणि सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पथके तयार केले. सोनसाखळी चोराला जेरबंद करण्याच्या अनुषंगाने सखोल तपास आणि चौकशी सुरू केली. चैन स्नॅचिंग करण्याची पद्धत अभ्यासली, त्याचबरोबर अभिलेखा वरील गुन्हेगारांची माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याचबरोबर गुप्त बातमीदारांचाही आधार घेण्यात आला. त्यानुसार कल्याण आंबिवली येथे इराणी वस्तीमध्ये सराईत सोनसाखळी चोर रहात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, हजरत पठाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अविनाश गंथडे, परेश म्हात्रे, योगेश दिवेकर, महेंद्र वायकर, सम्राट कांबळे, साधना पवार हे पथक आंबिवलीला रवाना झाले. सम्राट डाकी, मिथुन भोसले, चंद्रशेखर चौधरी, नितीन झाले. संदीप भोईर, योगेश भुतकर, राजू लोखंडे, महेश बगाड या खडकपाडा पोलीस ठाण्यातील अंमलदारांच्या मदतीने इराणी वस्तीमध्ये सापळा रचला. सलमान साजिद जाफरी (वय 22 वर्ष रा. आंबिवली) याला फिल्मी स्टाईलने पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने जेरबंद केले. या आरोपीच्या अटकेमुळे पनवेलसह नवी मुंबई परिसरातील चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस येणार आहेत . 
फोटो - आरोपीला जेरबंद करताना पोलीस
Comments