डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स देऊन दिला मदतीचा हात ...
पनवेल वैभव / दि. ०१ ( वार्ताहर ) : डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स देऊन मदतीचा हात दिला आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे वाहतूक व्यवस्थापनात पोलिसांना मोठी मदत होणार आहे.
दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स दिले. उपयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला परीमंडळ ३ चे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब ढोले यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले. तसेच या बॅरिकेट्समुळे पनवेल शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत होईल. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्नशील असतात आणि अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून मिळणारी मदत पोलिसांचे काम अधिक सोपे करते असे सांगितले.
फोटो - १०० बॅरिकेट्स वाटप