नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत "विघ्नहर्ता" पुरस्कार वितरण समारंभ संपन्न...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत "विघ्नहर्ता" पुरस्कार वितरण समारंभ संपन्न...

पनवेल वैभव /  दि.१९ (वार्ताहर): नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 'सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२४' मधील उत्कृष्ट गणेश मंडळांना "विघ्नहर्ता" पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, पनवेल, प्रशांत मोहिते हे उपस्थित होते. तर  प्रमुख अतिथींमध्ये सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, भाऊसाहेब ढोले, सहा पोलीस आयुक्त विक्रम कदम, वपोनि नितीन ठाकरे, वपोनि गजानन घाडगे, जयंत पगडे, अजय बहिरा यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 
या कार्यक्रमात उत्कृष्ट गणेशमूर्ती गटात प्रथम क्रमांक श्री गणेश उत्सव मंडळ, स्वामी विवेकानंद चौक,उरण तर द्वितीय क्रमांक श्री गणेश मित्र मंडळ, सेक्टर ३४, कामोठे यांनी पटकावला. उत्कृष्ट कार्यक्रम व सामाजिक उपक्रम गटात प्रथम क्रमांक शंभो मित्रमंडळ, सेक्टर ३५, कामोठे, व्दितीय क्रमांक गणेश मित्र मंडळ, सेक्टर १८, खारघर, शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक गटात प्रथम क्रमांक जय दुर्गा क्रीडा व ग्रामविकास तरुण मंडळ, रोहिंजण, तळोजा तर द्वितीय क्रमांक अभिनव युवक मित्र मंडळ, पायोनियर विभाग, पनवेल यांनी पटकावला, उत्कृष्ट देखावा या गटात प्रथम क्रमांक राजे शिवाजीनगर रहिवाशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळंबोली. द्वितीय क्रमांक एकविरा मित्र मंडळ, तक्का, पनवेल, सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ गटात प्रथम क्रमांक जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रिटघर, तर द्वितीय क्रमांक अनमोल जीवन वेलफेअर असोसिएशन, उलवे यांनी पटकावला त्यांना उपस्थित मान्यर्वांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. 
तसेच यावेळी पनवेल कोळीवाडा येथे विसर्जनासाठी मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचा आणि परीक्षक मंडळाचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी अॅड. सुरेश बोंद्रे, खांदा कॉलनी, दत्तात्रय सुळेभाविकर, शामल आंग्रे, कविता ठाकुर, अॅड. श्रीमती संतोषी चव्हाण, आणि अॅड. सतिश देशमुख या परीक्षक मंडळांचा देखील सत्कार करण्यात आला.



फोटो: विघ्नहर्ता" पुरस्कार वितरण समारंभ
Comments