घरकाम करणाऱ्याने दागिने चोरले...
पनवेल दि.११(वार्ताहर): घरात काम करणाऱ्या नोकराने ४२ लाख ६० हजारांचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दौलत परमार असे आरोपीचे नाव आहे. सीमा सिंग या खारघर, सेक्टर २१ येथे राहत असून त्यांच्या घरात तिघेजण काम करतात. त्या, यांचे पती, मुलगा नेरूळ येथील ऑफिसमध्ये गेले होते. सायंकाळी घरी आले असता त्यांना चांदीचा तांब्या बाहेर दिसला. तांब्याबाहेर कसा आला हे पाहण्यासाठी कपाटाची चावी घेऊन पाहिली असता कपाटात ठेवलेले दागिने सापडून आले नाहीत. घरात काम करणाऱ्या नोकरांकडे विचारणा केली असता त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. त्यावेळी दौलत घरात नव्हता. त्याचा मोबाइलही बंद होता. तसेच कपाटातील दागिने, रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळून आले.