अर्टिगा गाडी व ट्रकच्या अपघातात दोन प्रवाशी जखमी ...
पनवेल वैभव / दि. १५ ( संजय कदम ) : पनवेल जवळील मुंबई - पुणे महामार्गावर किलोमीटर 1/ 800 मुंबई लेनवर येथे आज सकाळी ईरटीका गाडी व ट्रकचा अपघात होऊन यात दोन प्रवाशी जखमी झाले असून या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
ईरटीका कार गाडी क्रमांक एम एच ०१ डी आर ०३१७ ही घेऊन चालक सागर दिलीप गायकवाड (वय 30 वर्ष राहणार कोंडवा पुणे) हे पुणे ते मुंबई जात असताना त्यांच्या ईरटीका कारचे इंजिन गरम झाल्याने पनवेल जवळील किलोमीटर १/८०० मुंबई लेन येथे रस्त्याच्या बाजूला कार उभी करून थांबले असताना पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक एम एच ४२ बी ८१०२ यावरील चालकाने पाठीमागून आर्टिका कारला धडक देऊन ट्रक जागेवर सोडून पळून गेला आहे.अपघातात ईरटीका मध्ये एकूण दोन प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी धीरज गुप्ता वय अंदाजे २७ वर्षे यास मुक्का मार लागल्याने त्यांना ॲम्बुलन्स ने उपचारा करिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे नेण्यात आले आहे. अपघातात ईरटीका कारचे पाठी मागील बाजूचे नुकसान झाले आहे तसेच ट्रकचे समोरील बाजूच नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पळस्पे वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे .
फोटो - अपघातग्रस्त वाहने