पर्यावरण पूरक कागदी पिशव्या निर्मिती कार्यशाळा संपन्न....
पर्यावरण पूरक कागदी पिशव्या निर्मिती कार्यशाळा संपन्न....


पनवेल / प्रतिनिधी : -

चांगू काना ठाकूर महाविद्यालय खांदा कॉलनी मधिल 8 MAH Girls Bn, 3 MAH Boys Bn NCC Cadets  करीता कागदी पिशव्या निर्मिती या विषयावर एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना मूलभूत उद्योजकीय कौशल्यांनी सुसज्ज करणे हा होता
कागदी पिशव्या निर्मिती कार्यशाळेने विद्यार्थ्यांना पर्यावरणीय जाणीव वाढवताना मौल्यवान कौशल्य शिकण्यासाठी 
एक आकर्षक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. दृष्टी फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष किशोर देवधेकर सर यांनी पर्यावरणपूरक विविध प्रकारच्या कागदी पिशव्या बनवण्याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. कागदी पिशव्या निर्मिती उद्योगा
संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. 
सदर कार्यशाळा प्राचार्य डॉ . संजय पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे आयोजन लेफ्टनंट प्रोफेसर निलिमा तिदार यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. 
कागदी पिशव्या तयार केल्या नंतर  खांदा कॉलनी, पनवेल येथील किरकोळ दुकानात जाऊन दुकानदारांना प्लास्टिक पिशव्या न वापरण्या संदर्भात प्रबोधन केले व पर्यावरण पूरक कागदी पिशव्या वापरण्यासंदर्भात सुचना करण्यात आली. मोफत काही कागदी पिशव्या देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमात एनसीसी सिटिओ प्रोफेसर  सागर व्यवहारे, एनसीसी सिटिओ प्रोफेसर जितेंद्र पावरा , दृष्टी फाऊंडेशन संस्थेच्या सचिव सौ.नम्रता देवधेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
Comments