लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्ष पदार्पणनिमित्त १३ जुलैला रक्तदान शिबिर ....
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्ष पदार्पणनिमित्त १३ जुलैला रक्तदान शिबिर ....


पनवेल (प्रतिनिधी ) 
दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षनिमित्त युवा मोर्चाच्यावतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबविण्यात येत आहे या रविवारी आषाढी एकादशी असल्याने सदरचे शिबिर रविवार दिनांक १३ जुलै रोजी खारघर येथे होणार आहे.  भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष “रक्तदान उपक्रम” सुरु करण्यात येत आहे. 
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदापर्णानिमिताने विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.  हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार असून, विशेषतः थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांसाठी आणि इतर गरजू रुग्णांसाठी या रक्तदान उपक्रमाचे मोठे योगदान ठरणार आहे. ०६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने अनेक भक्तगण पंढरपूरच्या वारीला जात आहे. त्यामुळे या दिवशी आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबीर पुढील रविवारी होणार आहे, अशी माहिती खारघर युवा मोर्चाचे अध्यक्ष नितेश पाटील यांनी दिली आहे.
Comments