चंदुकाका सराफ प्रा.लि. यांच्या पनवेल स्टोअरचा शानदार शुभारंभ संपन्न...
चंदुकाका सराफ प्रा.लि. यांच्या पनवेल स्टोअरचा शानदार शुभारंभ संपन्न...

शुभारंभानिमित्ताने १ महिंद्रा थार व ३ ज्युपिटर बाइक्स जिंकण्याची संधी !! 

पनवेलवासीयांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद...


पनवेल वैभव / प्रतिनिधी :  - देशाची आर्थिक राजधानी असलेल्‍या मुंबई व कोकण यांना जोडणार्‍या आधुनिक, विकसित, संपन्न अशा पनवेल शहरात १९८ वर्षांची सुवर्णपरंपरा लाभलेली चंदुकाका सराफ प्रा.लि. सुवर्णपेढीचा मोठया उत्‍साहात शुभारंभ संपन्न झाला. 
यावेळी चंदुकाका सराफ प्रा.लि.यांच्‍या सुवर्णदालनाचा शुभारंभ सुप्रसिध्‍द सिने अभिनेत्री सायली संजीव, पनवेलचे माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्‍या शुभहस्‍ते व खासदार श्री. श्रीरंग बारणे, जे. एम. म्‍हात्रे इन्‍फ्रा प्रा. लि. चे संचालक, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्‍हात्रे, पनवेलच्‍या महापौर  कविता चौतमोल, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्‍हा काँग्रेस अध्‍यक्ष महेंद्रशेठ घरत, आमदार महेश बालदी, अॅड. श्रीमती वृषाली वाघमारे, उद्योजक विलास कोठारी, विश्‍वतेज साळवी,  रविंद्र घरत, चारूशिला घरत, मनिषाताई ठाकूर, मोतीलालजी जैन व चंदुकाका सराफ प्रा. लि. चे चेअरमन किशोरकुमार शहा, संचालक सौ. नेहा किशोरकुमार शहा व मॅनेजिंग डायरेक्‍टर कु. सम्यक किशोरकुमार शहा, डॉ. अनिकेत कुंभोजकर, डॉ. प्रियंका कुंभोजकर, श्री. निकेत फडे, सौ. सेजल पाटील तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्‍याप्रमुख उपस्‍थितीत नील हेर्मिटेज, सुरूची हॉटेल जवळ, पनवेल येथे संपन्न झाले.

यावेळी बोलताना माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले की, चंदुकाका सराफ प्रा. लि.यांच्‍या पनवेल सुवर्णदालनामुळे चंदुकाका सराफ प्रा. लि. व पनवेलवासीयांचा ऋणानुबंध अधिक घट्ट होणार आहे. सर्व पनवेलकर चंदुकाका सराफ प्रा. लि. यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे.
यावेळी बोलताना चंदुकाका सराफ प्रा. लि. चे चेअरमन श्री. किशोरकुमार शहा म्हणाले की, १९८ वर्षांची शुध्‍द सोन्‍याची परंपरा असलेल्‍या चंदुकाका सराफ प्रा. लि. यांची पनवेल शाखा सुरू करताना आम्हांला विशेष आनंद होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांशी विश्वासाचे नाते पिढ्यानपिढ्या पासून जतन करत चंदुकाका सराफ प्रा. लि. यांनी आज पर्यंत सुवर्ण वाटचाल केली आहे. पनवेलकरांचे आणि आमचे नाते अधिक दृढ होईल अशी मला खात्री आहे.
यावेळी पनवेलवासीयांनी खरेदीसाठी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला होता. 
शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर्स देण्यात आल्‍या आहेत. चंदुकाका सराफ प्रा. लि. यांच्‍या पनवेल स्टोअरमध्ये दि. ४ ते ९ जुलै २०२५ दरम्यान दागिने खरेदीवर महिंद्रा थार आणि ज्युपिटर बाइक्स जिकण्‍याची सुवर्णसंधी आहे. रु. ३०,००० किंवा त्याहून अधिक खरेदी तसेच रु. ३,००० किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी ही खास संधी असणार आहे.  तसेच १०%* सूट सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आणि १००%* पर्यंत सूट हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर देण्यात येणार आहे. 
 सर्व ग्राहकांनी चंदुकाका सराफ प्रा. लि.यांच्या ह्या नव्या स्टोअरला भेट द्यावी आणि दागिने खरेदीवर ज्युपिटर बाइक व महिंद्रा थार जिंकण्याची संधीही मिळवावी असे आवाहन चंदुकाका सराफ प्रा. लि.चे चेअरमन श्री. किशोरकुमार शहा व मॅनेजिंग डायरेक्‍टर कु. सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: 1800 267 8555



फोटो – चंदुकाका सराफ प्रा. लि. यांच्‍या पनवेल शाखेच्‍या शुभारंभ प्रसंगी सायली संजीव शेजारी श्री. किशोरकुमार शहा, कु. सम्‍यक शहा, सौ. नेहा किशोरकुमार शहा, श्री. महेंद्रशेठ घरत, श्री. विश्‍वतेज साळवी, डॉ. अनिकेत कुंभोजकर, डॉ. प्रियंका कुंभोजकर, श्री निकेत फडे, सौ. सेजल पाटील व अन्‍य मान्‍यवर.
Comments