पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या धडक कारवाईत गावठी दारूच्या टायरने भरलेली गाडी केली हस्तगत
पनवेल वैभव / दि. ०२ ( संजय कदम ): पनवेल तालुक्यातील सोमाटणे कोन गावाच्या हद्दीत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या धडक कारवाईत दारूच्या टायरने भरलेली गाडी हस्तगत करण्यात आली आहे .
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन गाडगे यांना एका खबऱ्या कडून या गाडी संदर्भात माहिती मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश धुमाळ , सुनील कुदळे , सतीश तांडेल ,शिवाजी बाबर ,विजय देवरे ,भूषण महारसे ,पोलीस शिपाई आकाश भगत , भीमराव खताळ आदींच्या पथकाने सापळा रचून गाडी क्रमांक एम एच ०३ ए झेड १९५४ ही गाडी थांबून तिची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गावठी दारूचे टायर विना परवाना जवळ बाळगून त्याची विक्री करण्याकरता नेत असल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाल्याने गाडी चालक अविनाश रसाळ याला गाडीसह ताब्यात घेण्यात आले . जवळपास पनवेल तालुका पोलिसांनी ३ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फोटो - गुन्ह्यातील गाडी