नफ्याचे आमिषाने १६ लाखांनी डॉक्टरांची फसवणूक
पनवेल दि. १९ (वार्ताहर) : भरघोस परताव्याच्या आमिषाने १६ लाख रुपयांची एका डॉक्टराची फसवणूक झाल्याची घटना नावडे येथे घडली आहे.
नावडे येथील एका डॉक्टरला ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारामध्ये अज्ञात व्यक्तीने नफ्याचे आमिष दाखवून त्यांची १६ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.