करंजाडेत ज्येष्ठ नागरिकांना "आयुष्मान वय वंदना" कार्डचे वाटप..
दमदार आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने करंजाडेत सामाजिक उपक्रम

मा. सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल / प्रतिनिधी : - उरण विधानसभा मतदार संघांचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने मा. सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यावतीने करंजाडे वसाहतीतील जेष्ठ नागरिकांना गरीब आणि गरजू लोकांसाठी 'आयुष्मान वय वंदना या योजनेअंतर्गत कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्डद्वारे ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार असल्याचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी आमदार महेश बालदी यांना म्हात्रे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, भाजप नेते बळीराम म्हात्रे, गजानन पाटील, राकेश गायकवाड, मनखुश नाईक, समीर केणी, नितेश सिलंकी, मंगेश बोरकर,उमेश भोईर केतन आंग्रे, संदीप नागे, प्रमोद शिकारे, निखिल डांगे, ओंकार चौधरी यांच्यासह महिला, जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments