डॉ .केतकी पाटील म्हस्के राष्ट्रीय समिट आणि पुरस्कार २०२५ ने सन्मानित ...
पनवेल / प्रतिनिधी : -
डॉ. केतकी पाटील म्हस्के स्त्री रोग तज्ञ आणि आय.व्ही.एफ. कन्सल्टंट यांना इंडियन फर्टिलिटी सोसायटीच्या सहकार्याने हॉटेल मेरीयेट मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय समिट आणि पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार माननीय अदिती ताई तटकरे बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते 22 जून 2025 रोजी प्रदान करण्यात आला.
डॉ. केतकी यांनी 2010 मध्ये एम एस ओ बी जी वाय पूर्ण केले, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या आयर्लंडला गेल्या. त्यांनी प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठातून आय. व्हि. एफ. आणि एम्ब्रिओलॉजीमध्ये फेलोशिप पूर्ण केली.
त्यांनी फ्रान्सच्या क्लेमॉर्ट येथे लॅप्रोस्कोपीचे प्रशिक्षण घेतले आहे. डॉ. केतकी त्यांच्या क्षेत्रातील कामाचा अनुभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर करीत आहेत.
डॉ. केतकी सध्या लाईफ लाईन हॉस्पिटल पनवेल येथे स्त्रीरोग तज्ञ आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
लाईफ लाईन फर्टिलिटी आणि आय. व्ही. एफ. सेंटरमध्ये कार्यरत असताना विविध स्तरातील वंध्यत्व जोडप्यांसाठी त्यांनी अपत्य प्राप्ती करून त्यांच्या संसारात फार मोठे योगदान दिले आहे.
शिवाय लाईफ लाईन फर्टिलिटी व आय.व्हि.एफ. सेंटर मध्ये सर्व प्रकारच्या सोयी तपासण्या व उपचार एकाच छताखाली जसे रक्त तपासण्या, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, पुरुष वंध्यत्वावरील तपासण्या व उपचार असे सर्व उपलब्ध करून दिल्यामुळे वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी ते एक वरदान ठरले आहे.
यामध्ये ज्या जोडप्यांमध्ये आधी उपचार करून देखील आय. व्ही. एफ. फेल झालेले असेल तर त्यासाठी लेझर चे उपचार व संयुक्त आयुर्वेदिक उपचार देखील आयुर्वेद तज्ञांकडून करून घेऊन त्यामध्ये अशा जोडप्यांना अपत्य प्राप्ती होऊन यश मिळाले आहे.
जोडप्यांच्या आर्थिक कुवतीनुसार त्यांना विविध प्रकारच्या उपचार पद्धती करून देऊन कुठलेही जोडपे परत जाणार नाही हा कटाक्ष त्यांनी परंपरेने जपला आहे.
डॉ. प्रकाश पाटील व डॉ. जयश्री पाटील यांची परंपरा राखण्यामध्ये त्या काही प्रमाणात का होईना परंतु यशस्वी झालेल्या आहेत.