पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आल्या पोलीस पाटलांना महत्वाच्या सुचना
पनवेल वैभव, दि.6 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांच्या मासिक बैठकीमध्ये वपोनि गजानन घाडगे यांनी आगामी सण, उत्सव लक्षात घेवून महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने आगामी सण उत्सव जसे बकरी ईद, वटपोर्णिमा त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने आपत्कालीन संपर्क क्रमांक देण्यात आला. तसेच गावातील अडीअडचणीवर चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. त्याप्रमाणे गावातील व परिसरातील संशयित वस्तू ,वाहने , इसम याची माहिती पोलिसांना देणे, अवैद्य धंद्यांची माहिती देणे, भाडेकरूंची माहिती देणे बाबत सोसायटी पदाधिकारी यांना माहिती देणे, त्याप्रमाणे डायल 112, सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर - 1930, कोस्टल गार्ड हेल्पलाइन नंबर- 1093 आदींची माहिती यावेळी देण्यात आली. प्रामुख्याने वपोनि गजानन घाडगे यांनी आवश्यक त्या सूचना व उपस्थित 41 पोलीस पाटलांना मार्गदर्शन सुद्धा केले.
फोटो ः वपोनि गजानन घाडगे मार्गदर्शन करताना.