शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी
"आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात
पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) : शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची सुरुवात केली आहे .
आज शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी कामोठे येथील सभेत शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिलेल्या घोषवाक्यानुसार आपल्या शाळेतील कार्यालयावर "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची सुरुवात केली.त्याचप्रमाणे त्यांनी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकानी सुद्धा आपल्या घरावर परिसरात "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावण्याचे आवाहन केले आहे .
फोटो - बबन दादा पाटील *