भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ पनवेलमध्ये महाविकास आघाडीची तिरंगा यात्रा ...
भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ पनवेलमध्ये महाविकास आघाडीची तिरंगा यात्रा ...


पनवेल / प्रतिनिधी  :-
जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी पनवेलमध्ये बुधवारी (दि. २१ मे) सकाळी १० वाजता महाविकास आघाडीच्यावतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तिरंगा यात्रेत महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील व्यक्तीरेखेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
          यात्रेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. तर पनवेल शहरातून यात्रा काढून काँग्रेस भवन येथे तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत भारत मातेचा जयजयकार करण्यात आला. तसेच 'पाकिस्तान मुर्दाबाद- आतंकवाद मुर्दाबाद' म्हणत दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
       यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हाती 'तिरंग्याखाली चालतो भारत मातेला वंदन करतो, हिंदुस्थान जिंदाबाद, भारत माता की जय, भूदल नौदल हवाईदल जिंदाबाद, भारतीय सैन्याचे आभार, दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सेनेचा अभिनंदन, सैन्याच्या सन्मानार्थ भारतीय नागरिक एकत्र', अशा घोषणा लिहिलेले फलक होते. यावेळी 'हिंदुस्तान जिंदाबाद-पाकिस्तान मुर्दाबाद, दूध मांगोगे तो खीर देंगे काश्मीर मांगोगे तो चीर देंगे' अशा घोषणा देण्यात आल्या. 
         याप्रसंगी माजी आमदार हुस्नबानू खलीफे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकापचे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, जिल्हा चिटणीस राजेश केणी, अनिल ढवळे,  माजी नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका शशिकला सिंग, निर्मला म्हात्रे, युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, कॅप्टन कलावत, अवचित राऊत, दीपक घरत, नोफिल सय्यद, अमित लोखंडे, जसविंदर सैनि, शशिकांत बांदोडकर, सुरेश पाटील, कांती गंगर,  बबन केणी, शिल्पा पाठक, मनोज बिरादार, सुदेशना रायते, जयश्री खटकले, आरती ठाकूर,  नीता शेनोय, कलावती माळी, गोसावी मॅडम, उज्वला गावडे, यतीन देशमुख, किरण सोनवणे, अरुण कुंभार, शौकत खान, प्रमोद भगत, शंकर म्हात्रे, विलास फडके, देवेंद्र मडवी, जयेश लोखंडे, चेतन म्हात्रे, रमेश राव, रमेश गोवारी, प्रविण जाधव, विश्वनाथ मते ,यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments