पहलगाम अतिरेेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांची पायी गस्त...
पहलगाम अतिरेेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांची पायी गस्त
पनवेल वैभव, दि.28 (संजय कदम) ः नुकत्याच काश्मिर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज सतर्कतेच्या भूमिकेतून पनवेल शहर पोलिसांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी पायी गस्त घालत अनेक बेकायदा व्यवसाय करणार्‍यांची झाडाझडती घेतली.
पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र हायअलर्ट सुरू आहे. पनवेलमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे हे अधिक सतर्क असून त्यांनी आज सायंकाळी पनवेल शहरातील महत्वाच्या बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी इतर अधिकारी व कर्मचार्‍यांच्या साथीने पायी गस्त घालत रस्त्यावर बेकायदेशीर व्यवसाय करणारे परप्रांतीय, वाहतूक कोंडी करणारे वाहन चालक आदींच्या संदर्भात त्यांनी लक्ष घालून काहींवर कारवाई करून आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेलकरांनी कोणतीही भिती न बाळगावी. पोलीस आपल्या सदैव रक्षणासाठी तत्पर असल्याचे तसेच कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना घडल्यास त्यांनी त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा पायी गस्तीच्या माध्यमातून वपोनि नितीन ठाकरे यांनी केले आहे.



फोटो ः पायी गस्त
Comments