तृतीयपंथी असल्याचे भासवून एका परिवाराला दुखापत करण्याची भिती दाखविणार्‍या त्रिकुटाला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात...
त्रिकुटाला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात


पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः साडी घालून तृतीयपंथी असल्याचे भासवून जबरदस्तीने तक्का येथील एका घरात घुसून आपसात संगनमत करून त्या घरातील परिवारास दुखापत करण्याची भिती दाखविणार्‍या त्रिकुटास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील तक्का परिसरात ही घटना घडली असून याबाबतची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.शाकीर पटेल, पो.उपनि.प्रियांका शिंदे, बीट मार्शल व अंमलदार हे त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या त्रिकुटाला ताब्यात घेतले. अधिक चौकशीमध्ये या त्रिकुटाने आपण तृतीयपंथी नसून पुरुष असल्याचे सांगितले व उदरनिर्वाहासाठी गेल्या काही महिन्यापासून साडी परिधान करून तृतीयपंथी असल्याचे भासवून पैसे जमा करत असल्याचे सांगितले. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी सतीश व्यंकट करमुळे (45), किरण सिताराम विभुते (35) व सुनील यल्लाप्पा मुळे (23) यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पो.उपनि.प्रियांका शिंदे करीत आहेत.
फोटो ः बोगस तृतीयपंथी
Comments