गुडघे आणि नितंब बदलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी उच्च-तंत्रज्ञानाच्या मदतीने रोबोटिक शस्त्रक्रियेला सुरुवात
नविमुंबई / (पनवेल वैभव ) मेडिकव्हर रुग्णालयात ७६ वर्षीय महिला रुग्णावर रोबोटच्या मदतीने गुडघा बदल शस्त्रक्रिया पार पडली. ही महिला गुडघ्याच्या संधीवाताने हैराण झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर ७६ वर्षीय वृद्ध महिला कोणाचीही मदत न घेता स्वतःहून चालू लागली.
· या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी मिस्सो उच्च-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रुग्णांवर शस्त्रक्रिया करणा-या रोबोटची मदत घेतली. मिस्सो रोबोटिक प्रणालीच्या मदतीने रुग्णांवर आता अचूक शस्त्रक्रिया साधणे अजूनच सोप्पे झाले आहे. ही रोबोटिक प्रणाली गुडघे आणि नितंबाच्या दुखण्याने हैराण झालेल्या रुग्णांच्या जीवनात आशेचा नवा किरण घेऊन आली आहे. या रोबोटिक प्रणालीच्या मदतीने होणा-या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांच्या तब्येतीत लवकर सुधारणा दिसून येतात.
*नवी मुंबई* : सध्याच्या काळात गुडघा आणि निंतब दुखण्याच्या समस्या केवळ वृद्धांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. अनेकांना दैनंदिन आयुष्यात गुडघेदुखी आणि नितंबदुखीच्या असह्य वेदना जाणवत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. गुडघे आणि नितंबदुखीचा वाढता त्रास लक्षात घेत नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयाने आता रोबोटच्या मदतीने गुडघे आणि नितंब दुखणीवर वेदनाविरहित उपाय शोधला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आता नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयात रोबोट गुडघे आणि नितंब बदलांची शस्त्रक्रिया केली जाईल. रोबोटच्या साहाय्याने वेदनाविरहित शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याने रुग्णांना फारसा त्रास जाणवार नाही. अचूक शस्त्रक्रियेचे आव्हान आता रोबोटच्या मदतीने शक्य झाल्याने रुग्ण लवकर बरा होतो, काही दिवसांतच चालायलाही लागतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
चुकीची जीवनशैली, स्थूलत्व, संधिवात आणि दुखापतींमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गुडघेदुखीचा आणि नितंबदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. या त्रासाने सर्व वयोगटातील लोकांना दैनंदिन आयुष्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रोजचे आयुष्य जगताना येणा-या मर्यादा लक्षात घेत रुग्णांनी आता डॉक्टरांकडे धाव घेतली आहे. या वाढत्या रुग्णांबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. ही समस्या ध्यानात घेत नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी आता मिस्सो तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तंत्रज्ञान प्रणाली रोबोटच्या मदतीने रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करते.
रोबोटच्या मदतीने नुकतीच एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेवर रुग्णालयातील डॉक्टरांनी गुडघे आणि नितंब बदलाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही महिला गुडघे दुखीने हैराण झाली होती. तिला गुडघ्यांचा संधिवात होता. आज, शुक्रवारी या वृद्ध महिलेवर डॉक्टरांनी मिस्सो तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेल्या रोबोटच्या मदतीने गुडघे बदलाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांतच ती चालण्यास सक्षम झाली. ही रोबोटीक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी फायदेशीर ठरली असून, शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पटकन बरे करण्यासही मदत करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या शस्त्रक्रियेमुळे आव्हानात्मक शस्त्रक्रियाही विनाअडथळा पार पाडणे शक्य झाल्याचे समाधान डॉक्टरांनी व्यक्त केले.
शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मेडिकव्हर रुग्णालयाचे ऑर्थोपॅडिक संचालक डॉ. दीपक गौतम यांनी वाढत्या गुडघे आणि नितंबदुखीच्या रुग्णांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘ आजकाल तरुणांमध्ये गुडघा आणि नितंब दुखणीच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे. या दुखणीतून बरे होण्यासाठी पारंपरिक शस्त्रक्रिया प्रभावी असल्या तरीही त्यातून रुग्णांना बरे होण्यास बराच वेळ लागतो. अंदाजे ७० टक्के लोकांना कधी ना कधी आयुष्यात गुडघा किंवा नितंब दुखण्याचा त्रास जाणवतो. त्यापैकी १०-२० टक्के रुग्णांना गुडघे किंवा नितंब बदलाची शस्त्रक्रिया करावी लागते. मिस्सो तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक शस्त्रक्रिया ही वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा आविष्कार मानला जात आहे. डॉक्टरांना रोबोटच्या मदतीने गुडघे आणि नितंब बदल शस्त्रक्रियेत अचूकता साधणे शक्य झाले आहे. बरेचदा शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांच्या शरीरातील रक्त वाया जाते. आता ही भीतीही दूर सरली गेली आहे. ही शस्त्रक्रिया संक्रमणाचा धोका कमी करते. परिणामी, रुग्णाचा रुग्णालयीन मुक्काम कमी राहतो. रुग्ण थोड्या दिवसांतच पूर्णपणे बरा होतो. ’’
यावेळी ही तंत्रप्रणाली नवी मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, अशी आशा नवी मुंबईच्या मेडिकव्हर रुग्णालयाचे सल्लागार ऑर्थोपॅडिक सर्जन डॉ. निखील यांनी व्यक्त केली. ‘‘नवी मुंबईतील रुग्णांना जागतिक दर्ज्याच्या रोबोटिक शस्त्रक्रियेचा लाभ घेता येईल. आता रुग्णांना रुग्णालयातील मुक्काम कमी झाल्याने ते आपल्या दैनंदिन आयुष्यात काही दिवसांतच परतू शकतात. मुळात शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना वेदना फारशा जाणवत नाहीत. त्यांना स्वतःहून हालचाल करणे शक्य होते, असेही डॉ. निखील म्हणाले.’’
मेडिकव्हर रुग्णालयाचे केंद्र प्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता यांनी मिस्सो ऑर्थो सर्जिकट रोबोटच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मिस्सो ऑर्थो रोबोट थ्रीडी इमेजिंग खास कारणांसाठी डिझाईन करण्यात आले आहे. या रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रियेत अचूकता साधता येते. रुग्णाच्या शरीरातील मऊ ऊतींचे जतन करता येते. इम्प्लांट योग्य रित्या बसवता येतो. परिणामी, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या शरीरात तातडीने सुधारणा दिसून येतात. मेडिकव्हर रुग्णालयाने रुग्णांसाठी या आधुनिक रोबोटिक प्रणालीचा अवलंब केला आहे. या प्रणालीच्या वापराने रुग्णांना शस्त्रक्रियेदरम्यान कोणत्याही गुंतागुंतीचा सामना करावा लागणार नाही. उपचार जलदगतीने होत असल्याने आता रुग्ण लवकर बरे होण्याचा काळ आता पूर्वीपेक्षाही कमी झआला आहे. शस्रक्रियेनंतर रुग्ण स्वतःहून चालतात. त्यांना कोणाचीही मदत लागत नाही. मेडिकव्हर रुग्णालय उत्कृष्ट रुग्णसेवेची खात्री देण्यासाठी वचनबद्ध आहे.’’
मेडिकव्हर रुग्णालयाच्या महाराष्ट्र विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनीही या नव्या रोबोटिक तंत्रप्रणालीबद्दल आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘ आम्ही रुग्णसेवा पुरवताना नावीन्यतेवर भर देतो. नवनवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार अंमलात यावा, याकडे आमचा कटाक्ष आहे. जेणेकरुन रुग्णांनाही सुरक्षितता लाभेल, आरामदायी उपचार घेता येतील. ’’