दक्षिण कोरिया येथील जागतिक तायक्वांडो स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचे घवघवीत यश.....
 रायगडच्या खेळाडूंचे घवघवीत यश.....    

पनवेल (प्रतिनिधी) : तायक्वांडोवाँन, मुजू, दक्षिण कोरिया येथे आयोजित १६ व्या जागतिक तायक्वांडो स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी ६ सुवर्ण, २ रौप्य व २ कास्य पदके मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे, पदक विजेते खेळाडू खालीलप्रमाणे, 
फाईट स्पर्धेत सुवर्णपदक: 
१ मयुरेश घरत २) मेघा पाटील ३) नंदिनी गुजाले ४) अक्षता भगत ५) रुद्रा जाधव फुमसे स्पर्धेत सवर्णपदक: १) रूद्रा जाधव  रौप्यपदक: मेघा पाटील व मयुरेश घरत कास्यपदक : अक्षता भगत व नंदिनी गुजाळे या सर्व विजयी खेळाडूंना ग्रांडमास्टर हुंग्नाम क्वान(९डान ब्लॅक बेल्ट) व रायगडचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते पदके वितरित करण्यात आली.

या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक व आंतररष्ट्रीय पंच सुभाष पाटील (७ डान ब्लॅक बेल्ट) व अनिल म्हात्रे (३ डान ब्लॅक बेल्ट) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, सर्व खेळाडूंचे शाळेतील प्राचार्यांनी फोनवरून अभिनंदन केले तसेच रायगड व नवी मुंबईतून सर्व खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, रायगड तायक्वांडो असोसिशनतर्फे सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Comments