पनवेलमधील उद्योजक मंगेश परूळेकर यांना 'सारस्वत रत्न' पुरस्कार प्रदान....
पनवेल वैभव / दि.३० (वार्ताहर) : सारस्वत चेंबर्सचा २०२४ चा 'सारस्वत रत्न' पुरस्कार पनवेलमधील उद्योजक मंगेश परूळेकर यांना नुकताच देण्यात आला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व डेंन्पो यांच्या हस्ते हा पुरस्कार परुळेकर यांना प्रदान करण्यात आला.
सिन्नपुरूष येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. पनवेलमधील ओरायन मॉल आणि एमपी बिल्डर्सचे मालक मंगेश परुळेकर हे सामाजिक क्षेत्रातील कामात नेहमी अग्रेसर असतात. या पुरस्काराबद्दल परूळेकर यांचे अभिनंदन केले जात आहे.
फोटो : मंगेश परूळेकर