नवी मुंबई मेडीकवर हॉस्पिटल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..
नवी मुंबई मेडीकवर हॉस्पिटल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..
नवी मुंबई – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मेडीकवर हॉस्पिटल्सने योग प्रशिक्षक रिचा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष योग सत्राचे आयोजन केले होते. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला असून सुमारे ५० लोकं यामध्ये सहभागी झाले. याप्रसंगी खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री राजीव शेजवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. योग प्रशिक्षक रिचा पाटील यांनी दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्त्व तसेच व्यायाम प्रकारांविषयी माहिती आणि प्रात्यक्षिक सादर केले. या सत्राची सांगता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शेजवळ आणि योग प्रशिक्षक रिचा पाटील यांच्या सत्कार समारंभाने झाली. या कार्यक्रमातंर्गत सर्वांगीण आरोग्य कसे सुधारता येईल यावर विशेष भर देण्यात आला. नवी मुंबईच्या मेडीकवर हॉस्पिटल्सच्या वतीने वर्षभर अशाप्रकारचे विविध उपक्रम राबविले जातात.
Comments