रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचे प्रमुख मार्गदर्शन....
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष निलेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल तालुका व पनवेल शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामगृह पनवेल येथे संपन्न झाली.
सदर बैठकीला महाराष्ट्राचे सहसचिव अरुण जाधव, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अरुण धिवर व राजेश हाटे उपस्थित होते. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दरवर्षी संपन्न होतो. त्याची पूर्वतयारी म्हणून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे लवकरच मिनी विधानसभा म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पक्षाची ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे व जिथे तिथे कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील त्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे करण्याविषयी चर्चा करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील ही पहिल्या टप्प्यातील पनवेल येथील बैठक संपन्न झाली. तसेच पेण, महाड, माणगाव , तळा , श्रीवर्धन, कर्जत खालापूर या ठिकाणी सुद्धा बैठकांचं आयोजन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. बैठकीमध्ये श्रीवर्धन तालुक्याचे अध्यक्ष म्हणून संयोग लोखंडे यांची निवड करण्यात आली. बैठकीला सातारा संपर्कप्रमुख विलास नांगरे हे ही उपस्थित होते.
त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातून महिला आघाडी अध्यक्ष मुमताज पठाण, समाधान कांबळे, चंद्रकांत वेळासकर, आसिफ शेख, जावेद मास्टर, दिलीप नाईक , विनोद धावारे ,समाधान कांबळे, नरेश परदेशी, मयूर गायकवाड, सुमन पाटील , आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.