जाणीव फाउंडेशन सुकापुर यांच्यावतीने आदिवासी भागांमध्ये ब्लॅंकेट वाटप...
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
जाणीव फाउंडेशन सुकापुर यांच्यावतीने थंडीच्या दृष्टिकोनातून आदिवासी बांधवांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये पनवेल तालुक्यातील छोट्या मोठ्या आदिवासी वाड्यांचा समावेश करण्यात आला होता.
जाणीव फाउंडेशनचे मा.उपसभापती राजेश केणी यांनी माहिती देताना या वाड्याचं वाटपाच नियोजन जाणीव फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून झाल्याचं सांगितलं.
वांगणी , लोणीवळी, आदइं सुकापुर ,छोटी धामणी, केवाळे, पंचशीलनगर नवीन पनवेल, सुकापूर , पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील हमाल बांधव या ठिकाणी ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
पुढील दोन दिवसात अनेक काही ठिकाणी देखील वाटप होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यापूर्वी अनेकदा जिल्हा परिषद शाळांमध्ये , कोल्हापूर आणि महाड पूरग्रस्त बांधवांना मदत, कोरोना काळामध्ये सुकापुर मधील गरजूंना अन्नधान्य किट मदत आणि रक्त प्लाझ्मा मदत,वृक्षारोपण कार्यक्रम, ब्लँकेट वाटप, कपडे वाटप, आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन ,अपघातग्रस्ताला रक्तदानाच्या रूपाने मदत , विद्यार्थ्यांना फी साठी मदत, गरजू महिलांना उद्योग व्यवसायासाठी मदत, विद्यार्थिनीला सायकल वाटप,करंबेळी आदिवासी वाडी येथे छोटासा बंधारा, हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी पोलीस मित्र या नात्याने मदत, समाजामध्ये जनजागृती मोहीम असे अनेक कार्यक्रम जाणीव फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी पार पडल्याचं राजेश केणी यांनी सांगितले.
श्री केशव चिलघर यांनी जाणीव च्या कामावरती विशेष प्रकाश टाकताना या संस्थेबरोबर काम करताना खऱ्या अर्थाने मानसिक समाधान मिळत असल्याची भावना व्यक्त केली आणि पुढील काळामध्ये जाणीव चे हजारो मेंबर तयार होतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
अनन्य ह भ प वामन शेळके यांनी जाणीव च्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी जाणीव फाउंडेशनच्या वतीने राजेश श्रेणी, संदीप यादव, केशवजी चिलघर, संतोष यादव, सागर जगताप, अण्णासाहेब पाटील भूषण घरत, काळुराम पाटील मालिनी भदवणकर ऍड.सयाजी शिंनागारे, दिनेश पाटील , विलास भोईर,श्री गवळी , राजेश आंब्रे, सुनील वानखेडे, श्री कदम, सचिन खरात राजन आळवे ,सुरेंद्र नेमलेकर , प्रमोद जी वारोकार,
विलास फडके, शेखरजी शेळके ,वामन शेठ शेळके, सुरेशजी कडव ,राजाराम पाटील ,राजेश घरत, श्री मोकल आदी मंडळी उपस्थित होती.