क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या मागणी नंतर पनवेल महानगरपालिकेकडून तोडक कारवाई....
पनवेल महानगरपालिकेकडून तोडक कारवाई....

पनवेल दि. ०७ ( संजय कदम  ) : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या मागणीची पनवेल महानगरपालिकेकडून दखल घेत परिसरात  तोडक कारवाई करण्यात आली. फॉउंडेशनच्या मागणीला यश मिळाले असल्याने त्यांचे जनमानसातून कौतुक करण्यात येत आहे.
                       पनवेल महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून अनधिकृतरित्या फुटपाथची जागा व्यापणाऱ्या विक्रेत्यांवर तोडक कारवाई व अनधिकृत शेड उभारणाऱ्या हॉटेल्स मालकांवर  कारवाई करण्यात आली. अशी मागणी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे यांनी  पनवेल महानगरपालिका प्रभाग 'ड' अधिकारी दीपक सिलकन यांच्या कडे निवेदन देऊन केली होती या मागणीची दखल प्रभाग 'ड' अधिकारी दीपक सिलकन यांनी घेऊन मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने त्यांचे व पनवेल महानगरपालिकेचे क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या  वतीने आभार मान्यता आले आहे . 
फोटो - पनवेल महानगरपालिकेकडून तोडक कारवाई
Comments