द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते उद्घाटन..
द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल / प्रतिनिधी  - : वीरेंद्र जगे यांच्या द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते 22 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. पळस्पे फाटा (पनवेल) येथे असलेल्या द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलमध्ये ग्राहकांना साड्यांसह, ज्वेलरी, बॅग, पर्स, लहान मुलामुलींचे कपडे, किड्स वेअर, महिलांचे कपडे, मेन्स वेअर आणि इतर वस्तूंची खरेदी स्वस्तात करता येणार आहे. या शॉपिंग मॉलचा पत्ता पळस्पे फाटा, डी मार्टच्या बाजूला असा आहे
      यावेळी तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर यांनी मराठी माणूस व्यवसाय करत असल्याचे पाहून आनंद वाटला असे सांगितले तसेच या शॉपिंग सेंटरमध्ये बऱ्याचशा वस्तू ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी 200 जण नोकरी करत असून भविष्यात 2000 जणांना नोकरी देण्याची हिंमत वीरेंद्र जगे यांच्यात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या शॉपिंग मॉल सेंटरमध्ये श्री स्वामी समर्थांचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. महिलांनी, नागरिकांनी या मॉलला अवश्य भेट देऊन खरेदी करावी असे आवाहन अभिनेत्री अक्षया देवधर यांनी केले. यावेळी अभिनेत्री अक्षया देवधर सोबत फोटो, सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी, महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image