‘कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालय,आयएचसीएल’ स्किल डेव्हलपमेंट करार...
कार्यशाळेत आवश्यक मूलभूत माहिती आणि हॉस्पिटॅलिटी कौशल्ये संपादन करता येतील

मुंबई /(पनवेल वैभव) २८ फेब्रुवारी २०२५:
भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने (IHCL) हल्लीच केलेल्या एका घोषणेनुसार त्यांनी गोवा सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयासोबत एक समझोता करार केला आहे. राज्यातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी देशातील सर्वात मोठे हॉस्पिटॅलिटी स्किलिंग सेंटर गोव्यामध्ये सुरु करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला आहे. गोव्याचे माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत, शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव श्री प्रसाद लोलयेकर, आयएएस आणि गोव्याचे कौशल्य विकास आणि उद्यमशीलता संचानालयाचे संचालक श्री एस एस गावकर यांच्या उपस्थितीत हा स्वाक्षरी समारंभ पार पडला.

श्री पुनीत छटवाल, मॅनेजिंग डायरेक्टर, इंडियन हॉटेल्स कंपनी म्हणाले,"गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून गोव्यामध्ये आघाडीचे स्थान भूषवत असलेली IHCL गोव्याच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध आहे. आगामी स्किलिंग सेंटर आमच्या 'पाठ्य'च्या ईएसजी+ फ्रेमवर्कला अनुसरून रोजगारक्षमतेमधील कमतरता भरून काढेल आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करेल, जे गोव्यातील प्रवास आणि पर्यटन उद्योगक्षेत्रासाठी अनुकूल ठरतील."

श्री प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा म्हणाले,"गोवा हे भारतातील आघाडीचे पर्यटनस्थळ आहे, पर्यटनाचे केंद्र ही गोव्याची ओळख दीर्घ काळापासून टिकून आहे. आयएचसीएलच्या या उपक्रमामुळे युवकांसाठी नवीन रोजगार संधी निर्माण होतील, पर्यटन उद्योगक्षेत्रात सातत्यपूर्ण वृद्धी व प्रगती घडवून आणण्याच्या गोव्याच्या व्हिजनला पाठिंबा मिळेल. शाश्वत पर्यटन इको-सिस्टिम विकसित करण्याच्या आम्ही आणि आयएचसीएल देखील बांधील आहे व हा समझोता करार त्याच बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. या उपक्रमासाठी भारतातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी कंपनी आयएचसीएलसोबत हातमिळवणी करताना आम्हाला आनंद होत आहे."

हे स्किलिंग सेंटर विशेष तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांची आणि कार्यशाळांची एक शृंखला प्रस्तुत करेल, उद्योगक्षेत्राच्या नवनवीन मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे कार्यक्रम आणि कार्यशाळा डिझाईन करण्यात आल्या आहेत. या सत्रांमध्ये आवश्यक मूलभूत माहिती आणि हॉस्पिटॅलिटी कौशल्ये संपादन करता येतील, यामध्ये भाग घेणाऱ्यांना सेवा क्षेत्रात करियर करण्यासाठी सक्षम बनवले जाईल. यामध्ये इंडस्ट्री-बेस्ड इंटर्नशिप देखील पुरवली जाईल, ज्यामध्ये कॉर्पोरेट वातावरणामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल, शिक्षण आणि रोजगार यांच्यातील अंतर दूर केले जाईल.
Comments