उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली मध्ये आरोग्य शिबिर...
पनवेल ता.9 ( बातमीदार) कळंबोली येथील मायरा हेल्थ केअर व सिद्धिविनायक हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटल कळंबोली या ठिकाणी ता.9 रोजी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले हीते. साधेपणाने समाज उपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याच्या मानस ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी हार,तुरे व बॅनबाजीला फाटा देत आरोग्य शिबिराचे आयोजन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करुन निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छां दिल्या. या निमित्त आरोग्य शिबीरा मध्ये संपूर्ण रक्त गणना, मूत्रपिंड कार्य परीक्षण, लिपिड प्रोफाइल, रँडम ब्लड शुगर, (अकस्मात रक्तातील साखर)हृदय विद्युतलेखी (ईसीजी) क्ष-किरण (एक्स-रे) सामान्य शारिरिक सपासणी,बालरोग स्त्रीरोग तपासणी,मधुमेह रूग्णांना विशेष मार्गदर्शन तसेच सी.बी.सी, शुगर, बी.पी, वजन, ऊंची,बीएमआय. इत्यादी तपासण्या करण्यात आल्या व मोफत औषधे देण्यात आली. मावळ चे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी अत्यंत कमी वेळात अतिशय सुंदर उपक्रम राबविण्यात आला या बद्दल रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे आणि सर्व पदाधिकारी यांचे भ्रमणध्वनीवर कौतुक केले. मोफत आरोग्य तपासण्या सर्वसामान्य नागरिकांना भेटणे विषयी सुंदर काम कोणतेही नसून या अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. या आरोग्य शिबिरात शेकडो लोकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली.या आरोग्य शिबिरासाठी सिद्धीविनायक हाॅस्पिटल डॉ. संजय कदम एमडी (मेडिसिन) डॉ. पल्लवी कदम एमएस (शल्यचिकित्सक) डॉ. नैना पटेल एमएस (स्त्रीरोगतज्ज्ञ) यांचे सहकार्य मिळाले या वेळी शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबिरातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. शिबिरादरम्यान रुपेश ठोंबरे, विनोद साबळे,डीएन मिश्रा, विलास कदम, सुनील गोवारी विशाल पवार यांनी उपस्थिती दर्शविली सदर चे शिबीर यशस्वी करण्यासाठी कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, संजय शेडगे,निलेश दिसले, सिद्धेश म्हात्रे, दिपक कारंडे, सुमित सुर्यवंशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट
आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत, त्यांचा वाढदिवस हार, तुरे, सत्काराला फाटा देत साधेपणाने समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्या अनुषंगाने परिसरातील गरिब व गरजू रूग्णांना या आरोग्य शिबिराचा लाभ झाला हे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे फलित आहे.
रामदास शेवाळे
जिल्हाप्रमुख शिवसेना पनवेल.