वाहन चोरी व मोबाईल चोरी करणारे सराईत गुन्हेगार गजाआड...
वाहन चोरी व मोबाईल चोरी करणारे सराईत गुन्हेगार  गजाआड

पनवेल वैभव,दि.5 (संजय कदम) ः पनवेल परिसरात तसेच इतर ठिकाणी वाहन चोरीसह मोबाईल चोरी करणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले असून यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत जवळपास 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात यज्ञ अपार्टमेंट, ओम ट्रेडर्स दुकानासमोर, डेरवली गाव येथे उभी करून ठेवलेली महिद्रां कंपनीचे पिकअप क्रं एम.एच 46 ई 3950 ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी करून नेली म्हणुन पिकअप मालकानी दिलेल्या तक्ररीवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर दाखल गुन्हयाचा तपास तसेच चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, अशोक राजपुत यांचे मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन घाडगे यांचे नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले. त्यानुसार पोनि गुन्हे आनंद कांबळे, सपोनि अनुरूद्ध गिजे, पोउपनि हर्षल राजपुत, पोहवा विजय देवरे, सुनिल कुदळे, महेश धुमाळ, शिवाजी बाबर, सतिश तांडेल, पोशि राजकुमार सोनकांबळे, आकाश भगत, भिमराव खताळ आदींच्या पथकाने कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सदर गुन्हयाचा तांत्रिक व गोपनिय माहितीद्वारे गुन्हयाचा सखोल व कौशल्यपुर्ण तपास करून सदर गुन्हयातील 2 आरोपींना निष्पन्न केले त्यामध्ये आरोपी कौशल पाटील व रणजित रामप्रकाश सोनी यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चार वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. अधिक चौकशीमध्ये अजूनही वाहने व इतर मुद्देमाल पोलीस हस्तगत करतील असा विश्‍वास तपास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान हे आरोपी गुन्हे करून अटक झाल्यावर शिक्षा भोगून पुन्हा याच मार्गाचा अवलंब करतात व आतापर्यंत जवळपास 16 गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदर आरोपींना दि. 7/02/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे.
फोटो ः अटक आरोपी व पोलिसांचे पथक
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image