को.ए.सो.च्या इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे “वार्षिक" संमेलनात प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती..
 “वार्षिक" संमेलनात प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती...


पनवेल : को.ए.सो. च्या इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे “वार्षिक संमेलन २०२५”आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मार्फत विविध कलात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात विविध राज्यातील वेशभूषा परिधान करून लहान मुलांनी विविधतेतून एकतेचा चांगला संदेश दिला. बौद्धिक कलेचे सादरीकरण विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांनी उत्कृष्ट रित्या मांडले होते. जीवनावश्यक वस्तूंचे छोटे स्टॉल्स उभारून लहान मुलांनी छोट्याशा व्यापाराचे एक उत्तम नियोजन करून दाखवले. एकंदरीत आपल्या शाळेतील विद्यार्थी आज सर्व गुण संपन्न आहे हे या संमेलनातून प्रकर्षाने जाणवले.
       शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंद यांनी खूप चांगल्या प्रकारे संमेलनाचे नियोजन केले होते, यावेळी शेकापचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. पालकांचा सहभाग ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा होता. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत  वी. सी. म्हात्रे, मानसी कोकील, वैशाली गावित, मनीषा पाटील व इतर शिक्षिका उपस्थित होते.
Comments