छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहिंजण येथील विद्यार्थ्यांसाठी तातडीने अंडरपास कार्यान्वित करावा ; पाण्याचा प्रश्‍न सोडवावा - शिवसेनेची (उबाठा) महानगरपालिकेकडे मागणी...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महानगरपालिकेकडे मागणी
पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहिंजण येथील विद्यार्थ्यांसाठी तातडीने अंडरपास कार्यान्वित करावा त्याचप्रमाणे तेथील भीषण पाणी टंचाईचा प्रश्‍न सोडवावा या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून त्यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
आज शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड-पनवेल शिरीष घरत यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. यावेळी पनवेल महानगर क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये रोहिंजण नाका येथे लाइटचा हाय-मास उभारण्यात यावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहिंजण या शाळेमध्ये 1200 विद्यार्थी शाळा शिकत आहेत. येथील मुख्य रस्त्यावर पनवेल-मुंब्रा रोडवर रस्ता क्रॉसिंग करताना अपघात होण्याच्या शक्यता निर्माण होत आहेत याकरिता, रोहिंजण नाका येथे असणारा अंडरपास कार्यान्वयीत करावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहिंजण ला पाण्याची भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याकरिता पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून मिळावी. घोट गाव येथेल स. नं. 29/1 व 29/3 मधील भातशेती व बागायतीच्या लगत कॉन्क्रीट प्लांट मुळे खूप नुकसान होत आहे, ग्राम विकास महसूल अधिकारी सजा पेंधर यांनी स्थानिक चौकशी व पंचनामा केला आहे तरीही आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही सदर बाब महानगर पालिके तर्फे किंवा संबंधित कार्यालया मार्फत योग्य ती कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, उपमहानगर संघटक सुनीत पाटील, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, सुनील पाटील, भगवान महाराज उपस्थित होते.
फोटो ः आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन देताना
Comments