बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी नामदेव गोंधळी घेणार १३ वी भांडाफोड पत्रकार परिषद...
बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी नामदेव गोंधळी घेणार १३ वी भांडाफोड पत्रकार परिषद...
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी फसवणूक झालेले गरीब शेतकरी नामदेव गोंधळी यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा त्यांना न्याय मिळत नसल्याने ते येत्या 6 मार्च 2025 रोजी 13 वी भांडाफोड पत्रकार परिषद घेवून शासनाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत वाचा फोडणार आहेत.
तालुक्यातील वावंजे येथे राहणारे फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी यांनी घेतलेल्या 12 व्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची जमीन वसई-विरार, पनवेल-अलिबाग या बहुउद्देशीय मार्गिकेत संपादीत होणारी महामार्गाच्या एका कडेची मौजे ः वावंजे सर्व्हे नं.123/2 एकूण क्षेत्र 0-38-70 जमिनीपैकी क्षेत्र 0-19-35 हे.आर. ही प्रतिवादी नं.1 विक्रांत गिरीश संसारे यांना दि.24/08/2020 रोजी विक्री केली होती. परंतु सदर जमिनीचा अगोदरचा मालक जमीन कायमस्वरुपी विक्री घेणारा याने तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्या मार्फत त्यांचे चुलते परशुराम गोंधळी यांची उत्तरेकडील जमीन दि.24/12/2021 रोजी विक्रांत गिरीश संसारे यांच्या नावावर केली आहे. त्या दरम्यान मी आजारी होतो व या माध्यमातून माझे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. याबाबत मी शासकीय सर्व दरबारी अर्ज फाटे केले असूनही मला अजूनही न्याय मिळत नाही तरी माझ्या झालेल्या फसवणुकीबाबत महाराष्ट्र शासनाकडे या आमदारांनी पाठपुरावा करून मला न्याय द्यावा ही मागणी केली आहे व मागणीला त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच मला शासनाकडून न्याय मिळेल असा विश्‍वास सुद्धा गोंधळी यांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी येत्या 6 मार्च 2025 रोजी महानगरपालिका मैदान पनवेल शहर येथे 13 वी भांडाफोड पत्रकार परिषद घेवून ते आपल्या अन्यायाला पुन्हा एकदा वाचा फोडणार आहेत.
फोटो ः नामदेव गोंधळी
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image