कामोठेत आमदार आपल्या दारी उपक्रमउपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान..
कामोठेत आमदार आपल्या दारी उपक्रम
उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान

पनवेल (प्रतिनिधी) कामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा उपक्रम रविवारी पार पडला या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. 
पनवेल महापालिका आणि शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे त्यानुसार कामोठे परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयामध्ये हा उपक्रम झाला. यावेळी नागरिकांनी सुरक्षा, आयुष्यमान क्लिनिक, पाणीटंचाई, प्रदूषण, ग्राउंड ,भाजी मार्केट, गार्डन, विरंगुळा केंद्र ,स्पीडब्रेकर, पाणीपुरवठा, अग्निशामक दल, पेट्रोल पंप, मालमत्ता करा संदर्भात शास्ती माफी ,लाईट रेल्वे स्टेशन परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ,अनाधिकृत गॅरेज, टॉयलेट ,विरंगुळा केंद्र, वाचनालय ,स्मशानभूमी, जिमखाना,मंदिरे अधिकृत करण्यासंदर्भातला विषय, पार्किंग यांसह विविध विषय नागरिकांनी मांडले या सर्व प्रश्नांची उत्तरे देत लवकरात लवकर या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असून प्रत्येक तीन महिन्यात नंतर या सर्व प्रश्नांचा पुन्हा एकदा आढावा घेणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले तसेच प्रत्येक महिन्यामध्ये एका शहरात आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तसेच नागरिकांनी मांडलेल्या समस्यातक्रारी सूचना मांडले आहे त्यांना दहा ते पंधरा दिवसांमध्ये लेखी उत्तर देणार असल्याची माहिती  दिली .एकूणच नागरिकांच्या समस्या आणि सूचनांचा विचार करून त्यांना योग्य ते सहकार्य आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली.  या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत ,विकास घरत, कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष वनिता पाटील, हॅप्पी सिंग, प्रदीप भगत, भाऊ भगत, राजेश गायकर, हर्षवर्धन पाटील,  विद्याताई तामखेडे, तेजस जाधव, दामोदर चव्हाण यांच्यासह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image