शिवशक्ती मित्र मंडळातर्फे होळी, शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन...
शिवशक्ती मित्र मंडळातर्फे होळी, शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन...
पनवेल वैभव, दि.28 (संजय कदम) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या लाईन आळी येथील शिवशक्ती मित्र मंडळातर्फे होळी तसेच शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दि.13/03/2025 रोजी होम (होळी पूजन), तसेच महिलांसाठी विविध क्रिडा स्पर्धा व पाचवी ते 10 वी च्या मुलांचे क्रिकेट सामने, 
शनिवार दि.15/03/2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, सिंगल डान्स, ग्रुप डान्स इ., रविवार दि.16/03/2025 रोजी लाईन आळी प्रिमियर लिग 2025 (वर्ष 10 वे) भव्य ऑक्शन सोहळा, 
सोमवार दि.17/03/2025 रोजी शिवजयंती उत्सव तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षिस वितरण समारंभ आणि मराठी व हिंदी गीतांचा सदाबहार कार्यक्रम, मंगळवार दि.18/03/2025 रोजी मंडळातर्फे विभागातील नागरिकांसाठी कराओके गाण्यांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम, 
बुधवार दि.19/03/2025 रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 
मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष,मार्गदर्शक रमेश गुडेकर, संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष रवि (पिंट्या) गोरे, कार्याध्यक्ष खंडेश धनावडे, समीर कदम, सहकार्याध्यक्ष प्रकाश (नानु) वाघे, सहकार्याध्यक्ष प्रवीण पोवार, खजिनदार संतोष तळेकर, हिशोब तपासनीस अरुण ठाकूर, संयुक्त चिटणीस प्रशांत नरसाळे, सहखजिनदार अनिकेत जाधव आदी आहेत. दरवर्षी या मंडळातर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना एक हजार वह्यांचे वाटप वर्षातून येणार्‍या पालख्यांना तसेच 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, शिवजयंती, गुढीपाडवा या दिवशी सरबत, दुध कोल्डींक्स, पाणी, बिस्किट वाटप त्याचप्रमाणे मंडळातील गरीब कार्यकर्त्यांना नवीन शर्ट-पॅन्ट, गणवेश वाटप आणि अनाथ आश्रमामध्ये आर्थिक व नित्त उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येते. अधिक माहितीसाठी रमेश (दादा) गुडेकर फोन नं.9870434350 येथे संपर्क साधावा.


फोटो  ः शिवशक्ती मित्र मंडळ
Comments