बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी नामदेव गोंधळी यांनी दिले तीनही आमदारांना निवेदन...
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी फसवणूक झालेले गरीब शेतकरी नामदेव गोंधळी यांनी पनवेल पंचायत समितीची सन 2024-25 च्या आमसभेत आ.प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी व आ.विक्रांत पाटील यांची भेट घेवून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा त्यांनी पाढाच वाचला व तसे निवेदन सुद्धा दिले.
तालुक्यातील वावंजे येथे राहणारे फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी यांनी घेतलेल्या 12 व्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची जमीन वसई-विरार, पनवेल-अलिबाग या बहुउद्देशीय मार्गिकेत संपादीत होणारी महामार्गाच्या एका कडेची मौजे ः वावंजे सर्व्हे नं.123/2 एकूण क्षेत्र 0-38-70 जमिनीपैकी क्षेत्र 0-19-35 हे.आर. ही प्रतिवादी नं.1 विक्रांत गिरीश संसारे यांना दि.24/08/2020 रोजी विक्री केली होती.
परंतु सदर जमिनीचा अगोदरचा मालक जमीन कायमस्वरुपी विक्री घेणारा याने तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्या मार्फत त्यांचे चुलते परशुराम गोंधळी यांची उत्तरेकडील जमीन दि.24/12/2021 रोजी विक्रांत गिरीश संसारे यांच्या नावावर केली आहे. त्या दरम्यान मी आजारी होतो व या माध्यमातून माझे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. याबाबत मी शासकीय सर्व दरबारी अर्ज फाटे केले असूनही मला अजूनही न्याय मिळत नाही तरी माझ्या झालेल्या फसवणुकीबाबत महाराष्ट्र शासनाकडे या आमदारांनी पाठपुरावा करून मला न्याय द्यावा ही मागणी केली आहे व मागणीला त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच मला शासनाकडून न्याय मिळेल असा विश्वास सुद्धा गोंधळी यांनी व्यक्त केला आहे.
फोटो ः नामदेव गोंधळी