मयुरेश नेतकर यांच्या कार्याची पावती ; प्रभाग १४ मध्ये रेणुका नेतकर यांच्या विजयासाठी आबालवृद्धांचा निर्धार..
मयुरेश नेतकर यांच्या कार्याची पावती ; प्रभाग १४ मध्ये रेणुका नेतकर यांच्या विजयासाठी आबालवृद्धांचा निर्धार!
पनवेल / प्रतिनिधी : -
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १४ मध्ये महायुतीच्या उमेदवार रेणुका मयुरेश नेतकर यांचा प्रचार आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विकासाच्या धोरणांना या भागात मोठी पसंती मिळत आहे. मात्र, या प्रचारात सर्वात जमेची बाजू ठरत आहे ती म्हणजे रेणुका नेतकर यांचे पती मयुरेश नेतकर यांनी या भागात केलेले प्रामाणिक काम आणि दांडगा जनसंपर्क!
​'काम हीच ओळख' – मयुरेश नेतकरांचा जनसंपर्क ठरतोय प्रभावी
​साई नगर, बंदर रोड आणि बावन बंगला या परिसरात मयुरेश नेतकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि नागरी प्रश्न सोडवण्यासाठी झटून काम केले आहे. "काम हीच ओळख" या सूत्रानुसार त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आज मतदारांच्या दारात जाताना कार्यकर्त्यांना अधिक आत्मबळ मिळत आहे. प्रभाग १४ मधील आबालवृद्ध 'नेतकर' अशी हाक मारून स्वतःहून आपला पाठिंबा जाहीर करत आहेत.
​साई नगर आणि बंदर रोडमध्ये भावनिक साद
​प्रचारादरम्यान एका वेगळ्याच उत्साहाचे दर्शन घडत आहे. मयुरेश नेतकर यांनी अडचणीच्या काळात धावून येण्याच्या वृत्तीमुळे आज सर्वसामान्य नागरिक रेणुका नेतकर यांना आपल्या घरातील उमेदवार मानत आहेत. पदयात्रेदरम्यान ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद आणि तरुणांचा सहभाग यामुळे महायुतीचे अन्य उमेदवार इक्बालभाई काझी, सारीका भगत आणि सतीश पाटील यांच्याही प्रचारात चैतन्य निर्माण झाले आहे.
विरोधकांच्या गोटात शांतता; महायुतीचा विजयाचा मार्ग सुकर
​जेव्हा उमेदवार किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने प्रत्यक्ष काम केलेले असते, तेव्हा प्रचारात कोणतीही अडचण येत नाही, याचा प्रत्यय प्रभाग १४ मध्ये येत आहे. मयुरेश नेतकर यांच्या कामाचा आवाका आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व या 'डबल इंजिन' विकासामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रभागात विरोधकांकडे सांगण्यासारखे मुद्दे उरले नसल्याने महायुतीचा विजय सुकर मानला जात आहे.
​"मयुरेश नेतकर यांनी या भागातील प्रत्येक प्रश्न आपला मानून सोडवला आहे. त्यांच्या याच कामाची पावती आज आम्हाला मतदारांच्या उदंड प्रतिसादातून मिळत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाने आणि ठाकूर परिवाराच्या विकासधोरणामुळे आम्ही हा गड मोठ्या मताधिक्याने सर करू."च
— रेणुका मयुरेश नेतकर (उमेदवार, महायुती)

​विजयाचा गुलाल निश्चित!
​बावन बंगला असो वा बंदर रोड, प्रत्येक गल्लीत केवळ महायुतीच्या घोषणा ऐकू येत आहेत. लोकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग १४ मध्ये महायुतीचे चारीही उमेदवार पनवेल महापालिकेत विक्रमी मतांनी प्रवेश करतील, असा विश्वास राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
Comments
Popular posts