गृह सजावट आणि भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडीचे कल प्रसिद्ध ; पेपरफ्रायने सादर केले ‘रिवाइंड २०२४ होम रिपोर्ट कार्ड’...
पेपरफ्रायने सादर केले ‘रिवाइंड २०२४ होम रिपोर्ट कार्ड’...

मुंबई,(पनवेल वैभव) १३ फेब्रुवारी २०२५ -: 
पेपरफ्राय या भारतातील आघाडीच्या फर्निचर आणि गृहसाहित्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने आपले ‘रिवाइंड २०२४ होम रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित केले आहे. या अहवालातून संपूर्ण देशातील ग्राहकांच्या ट्रेंड्सचा आणि गृहसजावटीमधील बदलत्या पसंतींचा आढावा सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, २०२४मध्ये भारतीयांच्या घरगुती खरेदीच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला असून, वैयक्तिकृत, सौंदर्यपूर्ण आणि कमी जागेत मावणाऱ्या सुटसुटीत उपायांसाठी वाढती मागणी दिसून येत आहे. ग्राहक आता घराच्या व्यवस्थापनावर आणि इंटिरियर स्टायलिंगवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याने होम डेकोर, फर्निशिंग्ज आणि किचन अ‍ॅक्सेसरीज ही पुढील मोठी कॅटेगरी ठरली आहे. एक सुबक, व्यवस्थित आणि कार्यक्षम घर उभे करण्याच्या दिशेने ग्राहकांचा कल वाढला आहे. २०२४मध्ये स्मार्ट फर्निचरला आणि टिकाऊ, जागा वाचवणाऱ्या गृहसाहित्याला मागणी वाढली आहे. केरळ आणि हिमाचल प्रदेशमध्ये बांबू फर्निचरच्या आणि रिसायकल केलेल्या डेकोर वस्तूंच्या वापरात वाढ झाली आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये कमी जागेत मावणाऱ्या उपायांसाठी मोठी मागणी असून, सोफा-कम-बेड्सची विक्री आता एकुणात ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. कॉम्पॅक्ट आणि मॉड्युलर डिझाईनकडे ग्राहकांचा वाढता कल दर्शविते.

‘पेपरफ्राय’च्या जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत संकलित केलेल्या डेटाचे हे व्यापक विश्लेषण आहे. त्यात फर्निचर आणि गृहसाहित्य यांच्या बाजारपेठेतील काही रोचक कल समोर आले आहेत. विशेषतः, बहुउद्देशीय फर्निचर, सौंदर्यपूर्ण वस्तू आणि जागा वाचवणारे काही उपाय हे या वर्षीच्या ग्राहकांच्या मागणीतील प्रमुख घटक ठरले आहेत. यामध्ये भिंतीवरील सजावटीचे साहित्य, सोफा थ्रो, ॲब्स्ट्रॅक्ट कार्पेट्स, मॅट फिनिश सर्ववेअर, हायड्रॉलिक बेड्स आणि फोल्डिंग डायनिंग टेबल्स यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. घरातील जागेचा जास्तीत जास्त उपयोग करणे आणि त्याचवेळी एक सुबक आणि वैयक्तिक स्पर्श असलेले वातावरण निर्माण करणे यास ग्राहकांची मोठी पसंती असल्याचे यातून दिसते.

मुख्य कार्यकारी अधिकारी, आशिष शाह, पेपरफ्राय म्हणाले,“होम रिपोर्ट कार्ड रिवाइंड २०२४ हा आमचा २०२३नंतरचा दुसरा अहवाल आहे. भारतातील फर्निचर आणि गृहसाहित्याच्या बदलत्या खरेदीच्या प्रवृत्तींचे स्पष्ट चित्र यात रेखाटले आहे. विशेषतः, बहुउद्देशीय फर्निचर आणि स्मार्ट डिझाइनच्या बाबतीत दिसणारे कल हेच सिद्ध करतात की ग्राहक आपल्या राहण्याच्या जागेची पुनर्कल्पना करीत आहेत. त्यांच्या या बदलांच्या केंद्रस्थानी एक ब्रँड म्हणून आम्ही राहतो, याचा आम्हाला अभिमान आहे. ग्राहकांसाठी उत्पादनांमध्ये सतत नावीन्य आणण्याची आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची आमची बांधिलकी पूर्वीपेक्षा अधिक ठळक झाली आहे.”

अहवालात बिगरमेट्रो शहरांच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. २०२४मध्ये एकूण नवीन ग्राहकांपैकी ४० टक्क्यांहून अधिक ग्राहक मध्यम व लहान शहरांतून आले होते. गोवा, नागपूर, कोची, वडोदरा, भोपाळ आणि लखनौ यांसारख्या शहरांमध्ये फर्निचर आणि गृहसाहित्य क्षेत्रात मोठी ग्राहक आकर्षित होत आहेत. या बदलाला प्रतिसाद म्हणून नवीन स्टोअर्स उघडणे, ओम्नीचॅनेल सेवा सुरू करणे आणि उत्पादन वितरणाची अधिक जलद क्षमता निर्माण करणे यामध्ये पेपरफ्राय गुंतवणूक करीत आहे.

ओम्नीचॅनेल पद्धतीने व्यवसाय करण्याच्या धोरणामुळे पेपरफ्राय कंपनीचा कारभार वाढत असून, ग्राहकांना येथे ऑनलाइन सोयीसुविधा आणि ऑफलाइन सल्लामसलत यांचे उत्तम मिश्रण मिळत आहे. ८०हून अधिक शहरांत पेपरफ्रायची १३५हून अधिक दुकाने आहेत. ‘पेपरफ्राय’ला ७० टक्क्यांहून अधिक फूटफॉल-टू-परचेस रूपांतरण दर मिळत आहे. कंपनीच्या डिजिटल आणि फिजिकल टचपॉईंट्सना मिळणाऱ्या प्रतिसादाचा हा मोठा पुरावा आहे. स्टोअरमधील ऑर्डर्स ऑनलाइन ऑर्डर्सच्या तुलनेत तीन पटीने अधिक मूल्याच्या असल्याचेही स्पष्ट झाले आहे, त्यामुळे २०२४मध्ये सुरू केलेल्या ‘असिस्टेड बायिंग’ सुविधेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सणासुदीच्या काळात लाइटिंग आणि डेकोरच्या मागणीत मोठी वाढ होते. यंदाच्या दिवाळीत या कॅटेगरीमध्ये १५० टक्के वाढ झाली. यावरून असे दिसते की गृहसजावटीच्या बाबतीत ग्राहक उपयुक्ततेपेक्षा स्टाइलला जास्त प्राधान्य देतात.
Comments