पनवेल शहर पोलीस ठाण्यातर्फे राबविण्यात आला तक्रार निवारण दिन...
पनवेल वैभव, दि.11 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यामार्फत महाराष्ट्र शासन, क्षेत्रीय कार्यालयांसाठीच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत आज पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला.
सदरवेळी वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने उपस्थित अर्जदार व गैर-अर्जदार यांच्या तक्रारी समजून घेऊन त्याचे संबंधित अधिकार्यांकडून निरसन करण्यात आले. तसेच उपस्थितांना सायबर सुरक्षा, नवीन कायद्यांविषयी मार्गदर्शन करून नवी मुंबई व्हाट्सअप चॅनल तसेच इतर हेल्पलाइन क्रमांकांविषयी माहिती देण्यात आली. नमूद वेळी 90 नागरिक उपस्थित होते.
फोटो ः तक्रार निवारण दिन