तरुणपिढीमध्ये आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्याची ताकद - आमदार प्रशांत ठाकूर
तरुणपिढीमध्ये आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्याची ताकद - आमदार प्रशांत ठाकूर 
 
पनवेल (प्रतिनिधी) कृत्रिम बुद्धिमतेमुळे वेगाने बदलत चाललेल्या पिढीला स्वतःमध्ये बदल करुन घ्यावे लागणार आहे. त्या अनुषंगाने आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्याची ताकद तरुणपिढीमध्ये असल्याचे प्रतिपादन पनवेल विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले. कळंबोली येथील सुधागड शाळेच्या सभागृहात सिंधुदुर्ग शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेचा ३७ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. त्यावेळी आ. ठाकूर बोलत होते. 
       
यावेळी सुधागडचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी विष्णू धुरे, प्रदीप परब, अनंत काणेकर, लक्ष्मण सूकी, सूर्यकांत गुरव, पांडुरंग गवंडळकर, कृष्णा सावंत, आनंद सावंत, देऊ सावंत, रामा सावंत, सखाराम साठे, अजीत तेली, ज्ञानेश्वर गावडे व इतर उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, सिंधुदुर्ग वासियांचे काम, रोजगार पोटी कळंबोलीत विसावलेल्या दोनशे कुटूंबियांचे कामाप्रती जिद्द आणि समर्पित भावनेचे कौतुक केले. सध्याच्या काळात तंत्रज्ञानात खूप प्रगती झाली आहे. त्यामुळे वेगाने बदलत जाणाऱ्या या तंत्रज्ञानासोबत नव्या पिढीने जुळवून घ्याव लागणार आहे, आणि तरुण पिढीत जिद्द आहे, त्यामुळे या आव्हानांना ते यशस्वीपणे सांभाळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Comments
Popular posts
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image