मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ५५ वर्षीय रुग्णाच्या दुर्मिळ किडनीच्या रोगावर यशस्वी उपचार...
मूत्रपिंडात आढळली ३५ सेमी लांबीची गाठ (सिस्ट)

नवी मुंबई : नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमधील सुप्रसिध्द यूरोलॉजिस्ट डॉ. विकास भिसे यांच्या नेतृत्वाखाली सर्जिकल टीमने ऑटोसोमल डोमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज (ADPKD) असलेल्या ५५ वर्षीय पुरूषावर एक अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तातडीने केली. रुग्ण गंभीर अवस्थेत आपत्कालीन विभागात पोहोचला, त्याला तीव्र पोटदुखी आणि मूत्रावाटे रक्तस्रावाची समस्या जाणवत होती. रुग्णाची मूत्रपिंडातील ३५ सेमी लांबीची गाठ (सिस्ट) काढून टाकण्यासाठी नेफ्रेक्टोमी करण्यात आली. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार दर १००,००० लोकांपाकी अंदाजे २५ ते ६८ रुग्णांमध्ये ऑटोसोमल डोमिनंट पॉलीसिस्टिक किडनी विकाराचे निदान होते. 

रुग्ण महेश यादव (नाव बदलले आहे)* यांना ऑटोसोमल डोमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीजने (यात किडनीमध्ये पाण्याने भरलेल्या लहान गाठी तयार होतात. या गाठींना सिस्ट म्हणतात) ग्रासले होते. हा एक अनुवांशिक विकार असून गेल्या काही वर्षांपासून रुग्ण डायलिसिसवर होता. मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉ. अमित नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णावर उपचार सुरू होते आणि त्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची योजना आखली होती.

*मेडिकवर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉ. विकास भिसे सांगतात की,* आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात पोहोचल्यावर रुग्णाच्या मूत्रातून बराच रक्तस्राव झाला होता. त्याला ऑटोसोमल डोमिनंट पॉलीसिस्टिक किडनी विकार असून तो त्यासाठी उपचार घेत होता. ऑटोसोमल डोमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज या आजारात किडनीमध्ये सिस्ट तयार होते व त्यात पाणी जमा होऊ लागते. मूत्रपिंडाची जागा ही द्रवाने भरलेल्या सिस्टने घेतली होती. हा एक दुर्मिळ असा अनुवांशिक विकार आहे.  ३५ सेमी लांबीचे व पाण्याने भरलेल्या द्रव्यामुळे दाब निर्मांण करणारे मूत्रपिंडाचे सिस्ट दुर्मिळ आहे. मूत्रपिंडातील गाठीमुळे रुग्णाचे पोट खूप फुगले होते आणि त्याला अस्वस्थ वाटत होते. जेव्हा मूत्रावाटे रक्तस्त्राव सुरू झाला तेव्हा मात्र परिस्थिती अधिक गंभीर व गुंतागुंतीची झाली. मूत्रपिंडाच्या गाठीचा आकार ३५ सेमी इतका होता आणि त्याचे वजन जास्त होते, त्यामुळे हे एक दुर्मिळ आणि आव्हानात्मक प्रकरण होते. यामुळे मूत्रपिंडाचा आकार वाढला असून संपूर्ण पोट ताणले गेले होते. शस्त्रक्रियेने ही गाठ काढून टाकणे अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक होते. यासाठी खुल्या शस्त्रक्रिया पध्दतीचा पर्याय निवडण्यात आला. ही शस्त्रक्रिया अवघ्या दोन तासांत आणि कमीत कमी रक्तस्त्रावसह यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर रक्तसंक्रमणाची आवश्यकता देखील भासली नाही. योग्य वेळी त्याच्यावर उपचार न केल्यास रक्तस्त्रावासारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी त्याला तो कामावर रुजु झाला. तो आता पुन्हा पुर्ववत जीवन जगत आहे.

मी वर्षानुवर्षे वेदना आणि अस्वस्थतेसह जगत होतो आणि मला जीवनाचा आनंद घेता येत नव्हता. जेव्हा रक्तस्त्राव सुरू झाला तेव्हा मी खुपच घाबरलो होतो. प्रसंगावधान राखत योग्य उपचार केल्याने डॉ. भिसे आणि त्यांच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो. मला नवे आयुष्य मिळाल्याचा खुप आनंद झाला असून माझ्या वेदना आणि संघर्षाचा काळ आता संपला आहे. यापुर्वी मला दैनंदिन कामांसाठी या कुटुंबियांवर अवलंबून रहावे लागत होते मात्र आता मी स्वतंत्रपणे माझी दैनंदिन कामं करु शकतो अशी प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.
Comments