मानवी हक्क दिनानिमित्त पनवेल पोलिसांनी आयोजित केलेल्या चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः आजच्या मानवी हक्क दिनानिमित्त पनवेल शहर पोलिसांनी शहरातील बान्स स्कूल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.
आजचा हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य, मानवी हक्क आयोग, मुंबई यांनी आदेश प्रेरित केले होते. त्यानुसार शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमध्ये असणार्या बान्स स्कूलमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून मानवी हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमा दरम्यान सपोनि सारिका झांजुर्णे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मानवी हक्क संरक्षण या विषयावर मार्गदर्शन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. सदर वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा भगत, 80 ते 90 विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ः सपोनि सारिक झांजुर्णे मार्गदर्शन करताना.