उरणमधून प्रितमदादा म्हाञे सर्वाधिक मतांनी निवडून येणार-मा. आमदार भाई जयंत पाटील
उरण : उरणमध्ये शेकापपक्षाचा आमदार नसल्याने उरण तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे. शहराची तर पुरती वाट लागली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून येथील जनता सैरभैर झाली आहे. या जनतेने ही अस्मानी संकट घालविण्यासाठी प्रितम जे एम म्हाञे याना निवडून आणण्याचा निर्धार केला असून प्रितमदादा म्हाञेच सर्वाधिक मतानी निवडून येतील असा विश्वास शेकाप चिटणीस मा आमदार भाई जयंत पाटील यानी व्यक्त केला. तसेच दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघर येथे आले होते. यावेळी त्यांनी येथे होत असलेल्या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव जाहीर करायला हवे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही आणि येथील विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची प्रोसेस सुरू आहे हे तरी सांगायला हवे होते, मात्र त्यांनी काहीही सांगितले नाही. त्यामुळे भाजप येथील प्रकल्पग्रस्तांची, नागरिकांची, फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते.
उरण विधानसभा निवडणूकी निमीत्ताने प्रितमदादा म्हाञे याची उरण येथे निवडणूक प्रचारार्थ जाहिर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात आ.जयंत पाटील म्हणाले की उरणचे नेतृत्व वाजेकरशेठ आणि नगराजशेठ यानी केले. नगराजशेठ हे मारवाडी समाजाचे होते पण ते येथील समाजाशी एकरूप झाले. त्यानी कधी आगरी समाजाचा द्वेष केला नाही. आगरी समाजाचा अवमान केला नाही. आजच्या उरण शहराला त्यानी चेहरा दिला. ओळख दिली. माञ आजच्या आमदारानी त्याला मुठमाती दिली. उरणचे नेतृत्व दत्ता पाटील, मिनाक्षी पाटील, विवेक पाटील यानी केले. त्यामुळे उरण मध्ये आवाज आपलाच असणार आहे. आजचे आमदार केवळ दलालीचे काम करत असल्याचा आरोपही त्यानी केला. त्यासाठी त्यानी आवरे येथील एका जमीन वादाचा किस्साही सागितला. उरण तालुक्याला पुर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याची ताकद केवळ प्रितमदादामध्येच आहे त्यामुळे प्रितमदादा सर्वाधिक मतानी निवडून येईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
यावेळी उमेदवार प्रितम जे एम म्हाञे यानी उरणच्या दैन्यावस्थेचा चिञपटच समोर दाखवून निष्क्रिय आमदाराचा पर्दाफाश केला. ते म्हणाले हे आमदार महोदय केवळ कमिशन लाटण्यासाठीच आमदार झाले आहेत. त्याना जनतेच्या समस्याचे काही देणेघेणे नाही. मी मतदार संघा बाहेरचा असल्याचे बाहेरून आलेला उपरा सांगतो. यापेक्षा मोठा विनोद नाही. उद्याच्या निवडणुकीत शिट्टी जोरात वाजली तर आपण हा आवाज वाया जावू देणार नाही.
यावेळी प्रकल्पग्रस्ताचे नेते गोपाळ पाटील यानी महेश बालदी याच्या काळया कारनाम्याचा चिठ्ठाच खोलून त्याचा भेसूर चेहरा बाहेर आणला. या निवडणुकीत आपल्या घरातील माणसालाच निवडून देवून आपल्या पाठी लागलेले नष्ठार्य संपवायचे असल्याचेही त्यानी सागितले. या कार्यक्रमात कॉम्रेड भुषण पाटील, सचीन ताडफले, महेश साळुंखे, रवि घरत याचीही भाषणे झाली. यावेळी उरण बार असोसिएशनने प्रीतम जे एम म्हात्रे यांना पाठिंबा दिला.
चौकट
प्रीतमदादा व्हीजन असलेले नेतृत्व...सचीन ताडफळे
नेतृत्वाजवळ व्हीजन असेल तर मतदार संघाचा कायापालट होतो. प्रितमदादा हे असे व्हीजन असलेले नेतृत्व आहे. महिलांच्या गर्भाशय कॅन्सर तपासणी व प्रतिबंधक लस देण्याचे त्याचे काम हे त्याचे द्योतक आहे. युवकाना प्रशिक्षण देवून रोजगार मिळवून देण्याचे त्यानी उचललेले शिवधनुष्य कौतुकास्पद आहे.
स्थानिकाना फसवून लुटमार करण्याचे दिवस संपले-महेश साळुंखे
काही काम न करता केवळ फसवणूक करायची अन दुसर्यानी केलेल्या कामाचे श्रेय लाटायचे धंदे सोडून द्या आता गाठ प्रितमदादाशी आहे असा थेट इशाराच साळुंखे यानी बालदी याना दिला.
लाव रे तो व्हिडीओ
उरणच्या दैन्यावस्थेचे विदारक चिञ मांडताना प्रितमदादानी थेट लाव रे तो व्हिडीओ स्टाईल चिञफितीच दाखवून भंपकपणाचा पर्दाफाश केला.