लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे संस्कृती व सांस्कृतिक कार्य वृद्धिंगत - पंडित उमेश चौधरी ..
लवकरच खारघरमध्ये नाट्यगृहाची उभारणी होणार 


पनवेल (प्रतिनिधी) आपल्या देशात संस्कृती आणि सांस्कृतिक कार्याला अनन्य साधारण महत्व आहे. हे कार्य पनवेलसह रायगडमध्ये वृद्धिंगत करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले,  आहे, असे प्रतिपादन रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांनी केले. 
          पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत असलेले महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने सांस्कृतिक उपक्रमे राबवत कलेला महत्व दिले आहे. दरवर्षी राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा, राज्यातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा, शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन संगीत सुश्राव्य मैफिल, देशाची संस्कृती असलेला मल्हार महोत्सव, दर्जेदार दिवाळी पहाट, असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमे दरवर्षी नियमितपणे आयोजित करून संस्कृती जोपासण्याचे काम होत आहे.   नवीन कलाकारांना  प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी मासिक सभेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले आहे. यामधून हजारो कलाकार तयार झाले आहेत. त्याचबरोबरीने जागतिक विक्रम झालेल्या १९२ तासाच्या अखंड भजन महोत्सवाचे आयोजन करून वारकरी सांप्रदायाची परंपरा जपली. त्याचबरोबरीने वारकरी सांप्रदायातील मान्यवर मंडळींचा सत्कार सन्मान सोहळा आयोजित करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचे काम त्यांनी केले आहे. सिने व नाट्य संस्कृती असलेल्या पनवेलकरांना आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले, त्यामुळे रसिकांना त्यांचे हक्काचे व्यासपिठ मिळाले. त्या धर्तीवर खारघरमध्ये नाट्यगृह उभारण्याचा संकल्प त्यांनी करून तशी मागणी व पाठपुरावा केला आहे. त्या अनुषंगाने लवकरच खारघरमध्ये नाट्यगृहाची उभारणी होऊन कलाकार आणि रसिकांना मोठी पर्वणी मिळणार आहे, असेही पं. उमेश चौधरी यांनी अधोरेखित करत त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभारही मानले. 
          आपला देश संस्कृतीप्रधान देश आहे. अनेक भाषा, धार्मिक विविधता असलेला आपला एकसंघ देश जगाच्या पाठीवर इतर कोणत्याही देशात दिसत नाही. त्यामुळे संस्कृती आणि सांस्कृतिक क्षेत्र वृद्धिंगत करण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन अग्रेसर राहिलेले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून यापुढेही हे सामाजिकदृष्ट्या कार्य होणार आहे, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याची आवश्यकता असल्याचे पं. उमेश चौधरी यांनी म्हंटले आहे.
Comments