पनवेल शिवसेनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव...
पनवेल शिवसेनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
पनवेल / वार्ताहर : -  पनवेल विधानसभा मतदारसंघात विजयाचा चौकार मारणारे भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना पनवेल शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी मिळून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपासून सामान्य शिवसैनिकापर्यंत सर्वांनीच युती धर्माचे पालन करत प्रशांत ठाकूर यांचे निवडणुकीत एकदिलाने काम केले. त्यांच्या विजयानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या ठाकूर यांच्या निवासस्थानी त्यांचा जाहीर सत्कार करत अभिनंदन केले.
यावेळी संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, महिला संपर्कप्रमुख शिल्पा देशमुख, उत्तर रायगड महिला जिल्हाप्रमुख सुप्रिया साळुंखे, महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण, उपजिल्हाप्रमुख परेश भाई पाटील, महिला जिल्हा संघटिका रीना पाटील, महानगर संघटक मंगेश रानावडे, महिला तालुका प्रमुख मंदाताई जंगले, तालुका उपसंघटक नरेश आत्माराम, उपमहानगरप्रमुख, महेश सावंत, सचिन मोरे, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, नवीन पनवेल शहर प्रमुख अतुल मोकल, खारघर शहर संघटक इम्तियाज जलील, तळोजा विभागप्रमुख प्रकाश म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक राकेश गोवारी,  पनवेल शहर व नवीन पनवेल शिवसेनेचे सर्व उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण निवडणुकीत आपण एक टीम म्हणूनच काम केले. याचा अभिमान व्यक्त करत सर्व शिवसेना पदाधिकारी यांचे आभार मानले.
Comments