कामोठेतील निर्भय फोरमचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा
पनवेल : -गेल्या पाच वर्षापासून कामोठ्यामध्ये कार्यरत असलेल्या निर्भय फोरम या संस्थेने महायुतीचे उमेदवार व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिला आहे.
कामोठ्यात झालेल्या बैठकीमध्ये निर्भय फोरम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व सामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. नागरीकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी त्यांना फोरमने हा पाठिंबा जाहिर केला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष के. के. म्हात्रे यांच्यासह फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.